Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

पश्चम-देशीं गुजरात प्रांति खंबैत परियंत उत्तर हेंदुस्थान राठवड देश घेतला ।। या रितिन ते राजे सूर्यसोमवंशि ब्रह्मक्षेत्रि ।। परब्रह्म उत्पन तयाचं वंशि ।। जाणुन ब्रह्मक्षेत्रि म्हणिजे तयांचा नेम ।। कुकुटशब्दापासोन उठावें ॥ शौच्य स्नान संपादावें ।। देवपुजन नित्यकर्म आचार्य-संयुक्त पंच ब्राह्मण-संयुक्त भोजननैवेद्य ब्राह्मण-उचिष्ट ।। धर्म-निति-शास्त्र अनुमत्तें पंडितमुखीं न्याय संपादावा ।। हा खटाटोप करायास पुराण प्रत्यहि आयकावें ।। ऐशा प्रसंगि यवन आपुले समुदाई युद्ध करायास संनिध होउन कावित्रें करून हेर काढुन या ऐशा प्रसंगिं राज्यास मारावें व राज्य हिरोन घ्यावें यैसें करून बहुत देश नेला व आपला केला ॥ हें पाहुन दुस-या राज्याहि आपले पुरोहितीं मजकुर केला जर आचार्य आपले हस्तीं पुजाविध संपादुन श्रेय राजयांस द्यावें ।। साहसहस्त्र मुस्तेद होउन आपले मंडळिकीं मिळोन भोजन संपादावें ॥ येक मात्र स्नान ।। खुणेस यज्ञोपवित ॥ राणे ठकर सींग इत्यादिकीं शस्त्र कमर बांधुन भोजनास बैसावें ॥ यैसा नेम केला ।। ते समइं म्लेंछाचे तयांसि चालत नाहिं ।। मागें बहुत युद्धसंपादिलीं ।। म्लेंछ तहास आणिले ॥ जागोजागेचे राजे आपले वळकटिन तुर्क इरिस आणिले ।। परंतु दिलिपतितक्त तयांचे हस्तिं पडलें ।। तेधवां तह जाला ।। जर रजपुत्रांचि कंन्या यवनास द्यावि ॥ वाम अंगुष्ट कुकुंमटीळा सवा फत्तेसिंगि राजमहाराजनाम तयां कुळिं त्याहि करावा ॥ ते समइं तों छत्रधर सार्वभोम नाम तयास ।। या रिती उभयराज्य येकमत्तिं वर्तुं लागलिं ।। ऐसा संकळित मात्र स्वज्ञा ।। कां जर बहुत देशदेशिंच्या कथा लीहितां फार विस्तार होईल ।। या मध्यें बहुत पेढ्या तुर्काच्या गुजरल्या ।। यैसे प्रसंगि धर्म शंकराचार्यी रक्षिला ।। श्रीगेरिस मठ स्थापिला ।। दुसरा मा + संप्रदाय मठस्थापना श्रीपाद कनोजि ब्राह्मण मठाधिकारि व धर्मरक्षणार्थ शंकर अवतारी दक्षणप्रांति राहिले ॥ कानडा रामराजा कुदुबश्या तयाचा पाळेकर असतां दैवि इछा पंचवरुणा मध्यें वैर उत्पन्न होतां नवा लक्षाचि सैनिक समागमे असतां तया हस्तें मृत्य जाला ।। सेवट ठीकाणे ठिकाणी जे जेथे होते ते राज्य अधिकारि जाले ।। यैशा कथा वर्तल्या ।। सर्व देश बहुत राजे जाले ।। ते शाहाणव कुळिंचे ॥ तुव्हेरि भोसले चव्हाण जाधव घोडपडे दाहाबाडे काबरे बुधले कवाड इत्यादिक जागोजागि पाटलिका देसमुख्या वतनदार जमीदार ठीकाणदार ते तयाचे मंडळिक राजे च जाले ॥ या आपले देशिं देसाये पाटेल चोधरी वतनदार इजारदार महालदार कुळावि कुळुबि म्हतारे चवघले साहाणे ।। ऐसे रीतीन उद्यमी ताड-माड-सरा काढायास राउत सिंधे पैकि आचार धरिला।। कितिक कडु म्हातारे पाटेल चोधरि चोरघे ठाकुर परभु ऐशा नवकुळया हा उदिम धरिला ।। नीमित्या यां शस्त्रधारियांस कबिले वाढले ।। उपार्जित थोडि ।। समुदाय खर्चिस वतने न पुरत ॥ या करितां हा उद्यीम धरिला ।। कौळी सवे सावे चूरी चोधरी राउत वर्तक म्हातारे देसमुख नायक भोईर माळी या बारा कुळ्या ।। याहिं वाडिमळे-केचा उदिम धरिला ।। कोळायसिलायचे कुळिंचे यांहि सिल्पिक उदिसि आणिक दुसरे मध्यें प्रवेशले ।। पुरो राणे दरणे प्रभु याहिं कारकोन-सत्त धरिले ।। शेषवंशि बहुत कुळे ।। शोमवंशि देशले म्हतारे नायक रुत राउत चोधरी पाटेल वर्तक पुरो ठाकुर साण्हे कौळी माळी सुतार दरणे पुरो यात हि असत ॥ यैस्या या कुळया ।। या समंति कृषि धरिली ।। हा संप्रदाय निराळा जाला ।। सेतिसंप्रदाये निराळा ।। कांसार संप्रदाय निराळा ॥ तांबट पोगार निराळे ।। लोहार गाडघडे निराळे ।। बाहारे निराळे ।। मासि नीराळे ।। वैति नीराळे॥ कोळि सोनकोळि नीराळे ॥ ढारेकोळि नीराळे ।। आगरि खुम नीराळें ॥ खारु नीराळे ।। डोखळें निराळे ।। सर्वा वर्णावर्ण नट भाट बुरुड चर्मक अंत्यज जाति ॥ यास सर्व माराष्ट्र ।। सर्वांस ब्राह्मण श्रेष्ट ।। वर्णभेद, गोताचि कर्मे भिन्न, वर्तणुक आचार भिन्न, पहिराव भूषणे भिन्न, भाषा भिन्न ।। भीन्न भीन्न देशिंचे देशाचार आहेत ।। कुळाचार आहेंत ॥ वंशाचार आहेत ॥ देवशास्त्राचार आहे ।। तो श्रेष्ट व कुळाचार देशाचार श्रेष्टे ॥ श्लोक ॥ स्वधर्मे परमं श्रेष्टं परधर्मो भयावहः ।। ऐसे हे भगवद्गीतेचें वचन ॥ ते असें ।। जर आपआपले बर्मि असावें ।। गुरुवाक्ये गुरुसिं मानावें ॥ देव गुरुरुपें सर्वांसरक्षिता ॥ सुख देता ॥ दुष्कर्मे दुर करिता ।। अंति सायुज्यता मुक्ति देता ।। तर हा धर्म सर्वधर्माचा जीव ।' मुळधर्म माराष्ट्र स्नान गुरु-उपदेश मंत्रजप प्रत्यहि करावा ।। जे गुरु संख्या मांगेल त्या प्रमाणें सूर्यास नमस्कार सूर्यव्रत आचरावें ।। विशेषें करोन सूर्यवंशि व सोमवंशि गणेशचतुर्थि संकष्टि यथानेमे कराव्या ।। शेषवंशिं सोमवार-व्रत महादेवाचें करावें ।। कुळस्वामिची तीथ यथानेमे उपोषण ब्राह्मणहस्ते पुजन तयांस आमान्य दक्षणा द्यावी ।। कामिकव्रतें आचरावी ।। वार्षिकी नवचंडिका उपोषणे करावी ॥ घटस्थापना ब्राह्मणभोजने घालावीं ।। जातीभोजने घालावी ॥ सोहोळं गर्भाधान पुंसवन चौळ चुडाकर्ण मंत्रउपदेश व्रतबंध विवाह महोत्छाव कीलालकर्म गृहशांतिक गृहप्रवेश विद्यारंभ वाणिज्य कृषि सर्व हि कर्मे प्रारंभ ॥ श्रीगुरु कुळाचा ।। व स्थळगुरु स्थळाचा।। तीर्थगुरु तीर्थिचा ।। त्रिगुणात्मक गुरुमूर्ति ।। ब्रह्माविष्णुमहेश इति त्रिगुणात्मकरुप ।। परब्रह्म परमेश्वर अनादिरुप परमेश्वर याखिला विरंचि श्रृष्टि । हा धर्म सर्व-ब्राह्मणअनुमत्ते नायकोरावास व सर्व समुदायाम संनिद्ध ।। हे सर्व महाजन ।। हे वाग्वोत्तरी ।।