Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

देश ईनाम पातस्यान केला ॥ मग निका मलिक आणि मलिक आलावदिन दोघे राज्य करों लागले ॥ ईतुक्या उपर कजीया भाईंदरकरा वर घातला ॥ जे हे आपले गावांचा हसिल खात आहेत ।। ते पाटेल धरोन आणिले ।। ते दस्त केले ॥ तें देसल्या सोम ठाकुरास कळले ।। मग जावोन अर्ज केला ॥ जर हे हरामखोर होति ॥ जे जमि दिवानीचि त्याचा मसाला खातिल ॥ तें आईकोन निका मलिक कोपला ।। हिसाब केला ।। जर याहि हिसाबी ३२००० सजगाणि देणे ।। मग ती सोम ठाकुरें देवोन सोडविले ।। तेंधवां भागडचु-यान निका मलिकास उडविलें ॥ जर हा सोमठाकुर कुफराणदार ।। यास शासन कांहि योजावें ॥ आणि मातबर फार जाली आहे ।। पैका फार आहे ।। तें आईकोन त्या सोमठाकुरास बोलावोन त्या वर १६०० हजार दाम काढिले ।। जर तुं आह्मास देणे आहेत ॥ तो ह्मणो लागला तुं दिवान आहेस ॥ आपण कोण्हास कव देणे नाही ॥ मग निका मलिकें त्या देशल्या वर हट धरिला ।। मग जैतचु-याचा पुत्र भागडचुरी बोलावोन देशलिक देशाचि देवों आदरिली ।। ते वेळि भागडचुरि बोलिला जर देसला सोमठाकुर आणि पांपरुत असतां कैसि चालेल ।। हे जर माराल तर केलि जाइल । हे असतां होत नाहीं ॥ मग निका मालिकें विचार केला ।। पात स्यायास कागद लिहिला ॥ जे आपण सायेबि हुकुम ह्मणोन या कोकणि आलों ॥ तेधवां हा भागडचुरि येवोन सर्व देशाचि जमी सांगितली ।। त्यांतिल जमी हे देसाये विकितात ।। लांच हि खातात ।। कांहि ह्मणावे तर देश मोडों पाहतात ।। या करितां हे हरामखोर हिंदु ॥ साहेबि बोलावोन न्यावे ॥ जें शासन घडेल तें करावें ।। पत्र देखतां दिल्लीस देसले नेले ।। त्यां मागे लाच हि पातशायासि पावला ॥ तेणे करोन पातशा हि कोपला ।। देसल्या जवळ पुसता जाला ।। जर जमि आपसंतोषें विकावि ।। गईबत करोन ।। भय नाहि ।। दुसरोन विलाथ मोडु पाहाता ।। जाब कठिण आईकोन सोमठाकुरें कुडु प्रतविला जर कबिला काढावा येथे अनर्थ आहे ॥ या उपर देसला सोम ठाकुर मारिला ॥ पायरुताचि खाल काढिली ॥ सोमठाकुराचें पोट चिरोन आताड्याचि वात करोन रक्ताचें तेल करोन दिवा जाळिला ।। नांदुरखिचे झाड खालिं रक्तें दिवा जाळिला ॥ परि हरामखोर न दिसे ॥ तेधवां पातशा विचारि पडला ।। तर देसलें व्यर्थ मारिलें ॥ हा सोमठाकुर ॥ याचे उदरि जो पुत्र असेल तो सर्वांचा दाप आणि मुगुट ।। ऐसि दुवा बोलिला ॥ मग भाटि तो हि वाखाणिला ।। पत्रें कोकणि पावली ॥ जर देसले मारिले ।। तें ऐकोन निका मलिकें भागडचुरि बोलावोन आणिला ।। देसलिकीचा विडा देवों आदरिला ॥ तेधवां गावोंगाविं मनुष्य धाडान सर्व देश जमा केला ॥ त्या प्रत श्रुत केलें ॥ जर देसले पातस्यायें मारिले ।। तर हा भागडचुरि आज पासोन चवदा प्रमाण्याचा दसला ॥ याचे आज्ञेन सर्वांहि राहावें ।। याचि आज्ञा जो मोडिल शासन त्यास आपण लाविन ॥ ऐसें बोलोन विडा देवों आदरिला ॥ तेधवां चहु गाविंचे उभे राहिले ।। ज्वाब केला ॥ जर आमचा देसाये सोमठाकुर आणि पांपरुत ।। त्या मागे त्याचा वंशिक जो असेल तो ॥ त्या विरहित कोणि सत्ताधारि आह्मास नाहीं ॥ या उपर तुं दिवान अहेस ।। परंतु आमचे ज्ञातिस न्यायास आमचा असेल तो आम्हास ।। या उपर हुकुम दिवान करितिल तर अवघा देस माफिल आहे ॥ ऐसा निकर चहु गाविंचे देसले बोलिले ।। पोईसकर ।। उतनकर ।। येकसारकर ॥ आणि कांधोळकर ।। उठोन चालते जाले ॥ ते निघोन गेले ।। तेधवां निका मलिकें भागडचु-यास जाव केला ।। जर घोणिस पायें ८४।। चहु पायां करितां घोण लंगडि नव्हे ।। तुला अवघा देश माफिल आहे । म्हणोन विडा दिधला ॥ भागडचुरि देसला केला ।। तेधवां भागडचुरि देसला बोलिला ॥ जर माझि दुराये देतां अवघ्याहि वोळगें यावें ।। न याल तर तुमचे पालवणपद काढिन वोलणंकराना देईन ।। तें आईकिलें ॥ येकसारकर बोलिले जर हें आमचें पद काढि ऐसा कोण आहे ॥ मग चहु गाविचे येकत्र मिळोन विचार केला ।। जर हें बरें नव्हे ।। आणि त्या भागडचु-यान दुष्टादुष्ट धरिली ।। भल्या भल्यांच्या स्त्रिया बळत्कारें कर्म आचरिला ॥ ते हि नीका मलिकास कळलें ।। त्याणे हि आज्ञा चहुं गाविं दिधली ।। मग ते चहु गाविंचे येकत्र मिळाले ।। विचार दृढ केला ॥ मग ठाण्यास गेले ।। तेथोन दादरुताला वृत्तांत सांगितला ॥ अवघ्यांचा विचार दृढ जाला ।। मग ठाण्या होवोन सर्व जमा पाहाडिस आले ।। आंबनाईकास भेटले ॥ मग तेथे राहिले ।। ते च दिवसिं भागडचु-याचा बंधु कमळचुरि विराणे वाजवित परताबपुरि जात होता ।। तों वाद्यांचा गजर दादरुते आईकिला ॥ मग पृछा केलि जर हे विराण कोण्हाचें ।। पाहाडकर ब्राम्हण बोलिले जर कमळचुरि भागडचु-याचा बंधु परतापुरि जात आहे ।। आईकोन दादरुत बोलिला जर हे विराण फोडि ऐसा कोण्हि आपल्यामध्यें आहे ॥ तेधवां पहाडकर ब्राह्मण बोलिले जर पोईसरकार आपलि भाख देतिल तर आम्हि भंगु ।। मग पोईसरकरि आपुलि भाख दिल्ली ।।