शिरोड - श्रीपद्र = शिरोड, शिरोळ. (भा. इ. १८३६)
शिरोळें - श्रीपद्र. (शिरोड पहा )
शिरोळें - सं. प्रा. श्रीनिलय. भिमथडी, कोल्हापूर, बेळगांव, ठाणें. (शि. ता.)
शिवगंगा - ( शिवगड पहा).
शिवगड - पुण्याच्या दक्षिणेस दहा बारा मैलांवर सिंहगड नांवाचा प्रसिद्ध किल्ला आहे. त्या किल्ल्याचें सिंहगड हें नांव शिवाजीनें तानाजी मालुसर्याच्या स्मरणार्थ ठेविलें; व मराठ्यांच्या इतिहासांत त्याच नांवानें तो किल्ला प्रसिद्ध आहे. शिवाजीच्या पूर्वी मुसलमानांच्या अमदानींत ह्या किल्ल्याला कोंडाणा म्हणत असत. हें नांव मुसलमानांनीं फारशी भाषेंतून ठेवलेलें नाहीं. गडाच्या पूर्वेस कोंडणपूर म्हणून एक गांव आहे, त्यावरून सान्निध्यामुळे कोंडणा असें गडाला मुसलमानांच्या पूर्वीच नांव पडलेलें आहे. “ अस्ति दक्षिणपथे कुंडिनपुरं नामनगरं” हें पंचतंत्रांतील वाक्य सर्वश्रुत आहे. तेंच हें कुंडिनपुर ऊर्फ अपभ्रंशानें कोंडणपुर असावें. परंतु हेंहि ह्या किल्ल्याचे सानिध्यानें नांव पडलेलें आहे; खरें नांव नव्हे. ह्या किल्ल्याचें खरें नांव शिवगड. गडाच्या माचीवरील कोळी आणि कल्याण वगैरे आसपासच्या खेड्यांतील गांवढे ह्या गडाला शिवगड म्हणतात. ह्या गडापासून जी नदी कोंडणपुरावरून पूर्वेकडे शिवापुरास जाऊन वनेश्वरावरून नीरेला मिळते, तिला शिवगंगा म्हणतात. तिच्या कांठीं असलेलें मोठं गांव शिवपूर होय. हें गांव शिवाजीच्या वेळेस अगदीं मोडकळीस आलें होतें. तेथें शिवाजीच्या मनांत एके वेळीं आपली राजधानी करावी असें येऊन, त्या गांवाची चांगली उस्तवारी झाली व त्यास शिवापूर असें नांव पडलें.
(महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)
शिवपूर - (शिवगड पहा).
शिवली - शिवपल्ली (शिव म्हणजे देव किंवा चांगलें). मा
शिवा - शिवा. खा न
शिवापुर - शिवा ( भवानी ). खा म
शीळ - शिला ( ग्रामं ). मा
शुकी - शुका. खा न
शृंगेरी - शुंगगिरि = शृंगइरि किंवा श्रिंगइरि = शृंगेरी, श्रिंगेरी. (भा. इ. १८३३)
शेकसोंडा - शेषशुंडा. खा प
शेंगोळे - शिंबिपल्लं. खा व
शेजवाळ - शय्यापाल: