Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक १११.
श्री.
१६८० वैशाख शु।।३.
श्रीम्हाळसाकांतचरणी तत्पर खंडोजी सुत मल्हारजी होळकर.
दस्तक सरकार राजश्री मलारजी होळकर ता राहादारांनी व कमाविसदारांनी व जमीनदारांनी व जकातेबाजे लोक माहालानिहाय आहद परगणे करोळी प्रांत जहांवटी तहद पुणे. सुहुर सन तिसा खमसैन मया व अलफ. राजश्री बाळाजी हरि दफ्तरदार, नि।। श्रीमंत प्रधान, याजकडील परगणे मजकुरींहून कुणबिणी सुमार १९ व उंटे नफर ५ वगैरे माणसे ऐसी येत आहेत. त्यांस मार्गी कोण्ही हाशीलाविशी मुजाहीम न होणे. जेथे राहतील तेथे चौकी पहारा देऊन आपआपली हद्दपार करून देणे. जाणिजे. छ२ रमजान मोर्तब सुद.


लेखांक ११२.
श्री.
१६८० वैशाख शु।। १३.
शके १६८१ प्रमाथी पे।। जेष्ठ शु।। १० मंगळवार, सन ११६८.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी- विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असले पाहिजे विशेष. आपण पत्र पाठविले ते पावले. लिहिले वर्तमान कळले. मौजे भडोले येथील ऐवजी हुंडी दत्ताजी नाईक जान्हे यांजवर रु ४२५५ ची पाठविली ती पावली. हुंडीचा सदरहू ऐवज सरकारांत छ ५ रमजानी पोता दत्ताजी नाईक याचे गुजारतीने जमा जाला असे. मौजे मजकूरचा समान व तिसाचा दुसाला ऐवज सरकारांत भरणा झाला, त्याचा जाब लेहून पाठवावा, म्हणोन लिहिले. त्यावरून सदरहू हुंडीचा ऐवज सुध्दां दुसाला जमा वसुलाचा हिशेब पाठविला असे. त्यावरून कळो येईल. कमविशीचे जमिनीचा आकार दुसाला येणे तो ऐवज पाठवून द्यावा. रा छ १२ रमजान, सु ।। तिसा खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.