भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(२५) पुरुषांनी अनेक स्त्रिया केल्या तरी अधर्म होत नाही, असे ब्राह्मणस्त्री म्हणते (आदि. १५८ बकासुरवध).

(२६) देवलोक व पितृलोक. गंगानदी देवलोकांत अलकनंदा हे नाव प्राप्त झाली आहे व पितृलोकात वैतरणी हे नाव मिळविती झाली आहे. पितृलोक म्हणजे where ancient fathers lived (जेथे पूर्वज रहात).

(२७) वसिष्ठाला शंभर पुत्र होते (आदि १७४). विश्वामित्राला शंभर पुत्र. धृतराष्ट्राला शंभर पुत्र. polygamy. बहुपत्नित्व. आहुकाला शंभर पुत्र (सभा - १४, पृ. ४५ b). सगराला ६०,००० पुत्र ( वन. १०६). सोमकाला शंभर भार्या (वन. १५८) व शंभर पुत्र. कुवलाश्वाला २१,००० पुत्र होते (वन. २०२).

(२८) ग्लेंच्छ : पल्हव, द्राविड, शक, यवन, शबर, किरात, बर्बर, सिंहल, खस, चुबक, पुलिंद, चीन, हूण, केरल (आदि. १७५).

(२९) नरमांसभक्षण : कल्माषपाद राजा राक्षस होऊन नरमांसभक्षक झाला (आदि - १७६). हिडिंब नरमांसभक्षक होता. कालेय दैत्य ऋषी भक्षण करीत (वन - १०२).

(३०) अयोध्येच्या कल्माषपादाने आपली पट्टराणी आपले पुरोहित जे वसिष्ठ त्यांजकडे पाठविली व गर्भाधान करून घेतले.

(३१) अग्रजन्मत्वाचा अधिकार : अर्जुनाला युधिष्ठिराने द्रौपदीशी विवाह करण्यास सांगितले असता, अर्जुन म्हणतो, आपला युधिष्ठिराचा विवाह प्रथम झाला पाहिजे नंतर क्रमाने इतर भावांचा (आदि-१९१). आम्ही धाकटे भाऊ आपले दास आहो. नकुल सहदेवांनी भिक्षा मागून आणिलेली धर्माच्या स्वाधीन केली. धर्म ज्येष्ठ सबब गुरु.

सुंद उपसुंदाला म्हणतो, मी वडील आहे, तेव्हा तिलोत्तमा माझी भार्या आहे (आदि-२१२). ज्येष्ठ बंधू, त्याच्या पूर्वी लग्न करणार कनिष्ठ बंधू व ती स्त्री, ही तिन्ही पतित होत. (शांति-१६५).

(३२) परतंत्र वैश्य म्हणून द्रुपद म्हणतो (आदि. १९२, पृ. ३८८ b).

(३३) राजगृह येथील अंबुवीच राजाचे राज्य त्याच्या महाकीर्ण अमात्याने आटोपले (आदि. २०४). ही कथा शुंगांच्या राज्याची आठवण करून देत्ये.