Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(१२) मनूपासून ब्राह्मण व क्षत्रिय झाले. वर्णव्यवस्था मनूपासून. क्षत्रियांत इला ही स्त्री लढाऊ झाली ( आदि. अ. ७५). रेत व शोणित या उभयतांचेही आधान इलेनेच केले. चतुर्धर म्हणतो की इलेला बुधापासून पुरूरवा झाला व तिने पुरूरव्याला राज्य दिले म्हणून मातृत्व पितृत्व इलेकडेच आले.
(१३) अ - पुरुष याचक किंवा भिक्षा स्त्रीची मागतो, याची उदाहरणे अनेक आहेत. पुरुष याचक Man proposer. शर्मिष्ठेने ययातीजवळ ऋतुभिक्षा, गर्भाधानाची भिक्षा किंवा याचना केली. स्त्री याचक Woman proposer (आदिपर्व ८२).
ब-सखीचा जो पती तोच तिच्या दुस-या सखीचा पती अशी चाल होती (आदि. ८२). दासी दोन प्रकारच्या (१) सखी दासी व (२) परिचारक दासी.
A man became husband to all the associates and followers of the chief girl. दासी s were the property of the chief girls & when the chief girl became wife & property of the husband, her दासी s also became property of the husband (आदि. ८२),
प्रमुख कन्येच्या सख्या आणि सेविका या सर्वांचा पुरुष पती होई. प्रमुख कन्येच्या दासी या तिची मालमत्ता असत आणि जेव्हा प्रमुख कन्या नव-याची पत्नी आणि मालमत्ता बने तेव्हा दासीसुद्धा त्या नव-याची संपत्ती बनत (आदि. ८२).
(१४) शास्त्राने उपभोग्य म्हणून ठरविलेली कामुक स्त्री जर एकांतात भोग मागेल तर तो तिला दिला पाहिजे, नाही तर तो धर्मदृष्टीने भ्रूणहत्या करणारा होतो असे नीतिवेत्ते म्हणत आले आहेत (आदि. ८३ पृष्ठ १९१ a). उलूपी अर्जुनाला म्हणते की मदनार्त स्त्रीची इच्छा पुरविणे एक रात्र समागम हा अधर्म नाही (आदि. २१४).
(१५) ययाति तुर्वसूला शाप देतो, गुरुदारेशी रत होणारे व पशूंसारखे ज्यांचे आचार विहार आहेत असे म्लेंच्छ लोक (आदि ८३ पृष्ठ १९२ b). उच्चवर्णाच्या स्त्रियांशी जेथे नीच वर्णाचे पुरुष रमतात असे अंत्यज (आदि. ८३ पृष्ठ १९२ b).