Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(५) सहगमन : मृताबरोबर स्त्री, गाय व मालमत्ता जाळीत असत. माद्रीने पांडूशी सहगमन केले. अग्निहोत्र्याबरोबर त्याचा अग्नी, यज्ञपात्रे, गाय किंवा शेळीं जाळींत व क्षत्रिय असल्यास धनुष्य मोडून जाळीत. स्त्री, अग्नी, यज्ञयात्रे ही जाळीत (आश्वलायन गृह्यसूत्र, अ. ४).
(६) गुरुतल्पगमन : उत्तंकाची कथा (आदिपर्व अ. ३). आश्रमस्त्रियांनी गुरुपत्नीचा ऋतू शांत करण्यास सांगितले. म्हणजे एके काळी स्त्रियांची ऋतुशांती वाटेल त्या पुरुषाने करण्याची पद्धत होती. म्हणजे अनिर्बेध लैंगिक संबंध promiscuity होते, नंतर शिष्यानेही ऋतुशांती करण्याची पद्धत होती, नंतर गुरुतल्पगमन अधर्म्य समजू लागले.
(७) गंधर्व, अप्सरा व ऋषी यांचा शरीरसंबंध : विश्वावसु गंधर्व व मेनका अप्सरा यांच्यापासून प्रमद्वरा झाली. ती रुरूची स्त्री झाली. गंधर्व व अप्सरा स्वापत्यांस वाटेल तेथे सोडून देत. प्रायः ऋषींच्या आश्रमासन्निध सोडून देत. Savages deserted their new-born children. रानटी लोक आपल्या नवजात अपत्यांना टाकून देत (आदिपर्व-अध्याय ८).
Temporary marriages. गौतम ब्राह्मण व जानपदी अप्सरा यांच्या क्षणिक समागमापासून कृप व कृपी झाली. (आदि. १३०). भरद्वाज व धृताची अप्सरा यांजपासून temporary तात्पुरत्या समागमाने द्रोणाचार्य झाला (आदि. १३०). व्यास व धृताची पासून शुक (शांति - ३२४).
(८) रुरूने आपले अर्धे आयुष्य सर्पदष्ट व मृत प्रमद्वरेला देऊन जिवंत केले (आदि. अ. ९).
(९) जरत्कारू प्रतिज्ञा करतो की स्वनामधेय कन्या आपल्या नावाची कन्या वरीन (आदि. अ. १३). जरत्कारू ब्राह्मण जरत्कारू नागीण यांचा शरीरसंबंध. गरुडाच्या तोंडात गेला ब्राह्मण व त्याची कोळीण स्त्री (आदि. २९).
(१०) व्यासास जनमेजयाने मधुपर्क व धेनू अर्पण केली (आदि ६०). परंतु अवध्य म्हणून त्यांनीं ती धेनू सोडून दिली. परंतु आश्वलायन गृह्यसूत्रात, पशुकल्पात व शूलगवकल्पात गाय वध्य म्हणून सांगितले असल्यामुळे गोवध व्यासानंतरही चालू होता असे दिसते.
(११) विश्वामित्र ऋषी व मेनका अप्सरा आपले मूल शकुंतला टाकून देतात. प्राचीन भारतात अपत्यांना उघड्यावर टाकण्याची आणि टाकून देण्याची प्रथा. Exposure and abandonment of children in ancient India.
Temporary marriage ? तात्पुरता विवाह ? संकल्प समागम ? दृष्टी समागम ? अल्पावधिक समागम. गांधर्व विवाह हा प्रथमारंभी अल्पावधिक होता. नंतर परस्परसंकेत एवढीच खूण गांधर्वसंबंधाची राहिली.
विश्वामित्र व मेनका यांचा समागम निदान दहापाच दिवस तरी झाला - दुष्यंतशकुंतलेचे गर्भाधान एकदोन घटकाच झाले (आदिपर्व अध्याय ७२, ७३, ७४).