Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

मग, राणी इतर बायांना पुनः म्हणाली, बायांनो ! मला कोणीच झवत नाही, सबब घोड्याजवळ मी निजत्ये. त्यावर एका बाईने खालील टीका केली : हरणी रोजचे रानातले गवत टाकून शेतातले चोरून जव खाते, परंतु त्याने तिचे पोट भरलेले तिला वाटत नाही. शूद्र स्त्री वैश्याशी चोरून रमते, परंतु त्या रमण्याने तिचे समाधान होत नाही.

ह्या टीकेला राणी उत्तर देते की, घोडा माझ्याशी संग करतो, त्याचे कारण एवढे की, दुसरा कोणीच मला झवत नाही. त्यावर दुसरी एक स्त्री टीका करते की तुझी ही योनी एखाद्या पाखरिणीसारखी हुळहुळून हलते आहे, तिच्यात रेत पडले आहे व ती गुलगुल वाजत आहे, मग तक्रारीला जागा कोठे राहिली ? ह्याही टीकेला राणी उत्तर करते की, तक्रार करू नको तर काय करू ? मला कोणीच पुरुष झवत नाही. सबब मी घोड्यापाशी जात्ये. यावर तिसरी एक म्हणते, तुला घोडा सापडला हे नशीबच समज. तुझ्या आईला तोही लाभला नाही. तुझी आई व तुझा बाप झाडावर चढत आणि नंतर तुझा बाप, योनी सोलून काढितो म्हणून, तुझ्या आईच्या योनीत आपल्या हाताची मूठच ठाशी, त्याहून घोडा बरा नव्हे ? तैत्तिरीय संहितेतील मंत्रांचा तपशील हा असा आहे. सायणाला ह्या मंत्राचा अर्थ व पूर्वापारसंबंध व शब्द बिलकुल काहीच कळले नव्हते.