Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(४) साम्राज्य, राष्ट्र, संपत्ती व वीर्यशाली प्रजा प्राप्त व्हावी एतदर्थ अश्वमेध यज्ञ करण्याचा प्रघात असे. यज्ञात स्त्रीपुरुष असा सर्व प्रकारचा समाज जमे. अध्वर्यु, उद्गातृ, होता असे ऋत्विज पुरुष असत व महिषी, यजमान-पत्नी इत्यादी स्त्रिया असत. पैकी वीर्यशाली प्रजा उत्पन्न व्हावी या कामनेच्या सिद्धयर्थ खालील नाटक केले जात असे. अश्वमेधातील घोडा मृत होऊन पडल्यावर तेथे राजपत्न्यांना बोलावून आणीत. राजपत्न्यांपैकी मुख्य जी पट्टराणी ती आपल्या आईला किंवा सपत्न्यांना उद्देशून म्हणे की, बायांनो, हा मेला घोडाच माझ्याशी निजेल; कारण, मला अभिगमनार्थ दुसरा कोणीच की गे नेत नाही. पट्टराणीची ही तक्रार ऐकून, घोडा खडखडून जागा होतो व पट्टराणीला म्हणतो, ये, येथे हे क्षौमवस्त्र म्हणजे सोवळ्याचे वस्त्र अंगावर घेऊन आपण निजू. त्याला रुकार देऊन पट्टराणी म्हणते, मी तुजपाशी गर्भधारणार्थ आले, तूही मजकडे गर्भ पेरण्यास ये, आपण पाय पसरून निजू, घोडा आणि पट्टराणी ही एकमेकांशेजारी पडल्यावर प्रतिप्रस्थाता म्हणतो की, हा घोडा रेतःसिंचन करो व तुझी योनी रेतोधारण करो. असा मंत्र म्हणून, ऋत्विज घोड्याचे लिंग राणीच्या योनीजवळ आणी, आणि म्हणे की, मांडीवर मांडी ठेव, आणि लिंग योनीत घाल. स्त्रियांना लिंग जीव की प्राण आहे. लिंग भोकाला झवते, ते स्त्रियांना प्रिय असते; कारण ते योनी कुटते, आणि स्त्रियांच्या काळ्या भोकातील दाण्याला हाणते. हे नाटक झाल्यावर राणी म्हणते, बायांनो, मला कोणीच झवत नाही, सबब हा घोडा मजपाशी निजतो. त्यावर इतर स्त्रिया म्हणतात, रानात फाट्यांचा भारा उचलताना ढुंगण जसे पुढे करतात तशी तू आपली योनी पुढे उचल व तिचा मधला भाग वाढव. हे सर्व पट्टराणीने केले, तेव्हा घोडा निजला.