Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
त्याला उद्धाता सांगतो की, ह्या वावातेला दगडावर टेकून जशी मोळी उचलतात तशी उचल म्हणजे हिची योनी वा-यात धान्य पाखडताना जशी सुपली पुढे येते, तशी पुढे येईल. यावर यज्ञभूमीवर एक स्त्री उभी होती, तिला वावाता म्हणाली, या उद्धात्याला दगडावर टेकून जशी मोळी उचलतात तसा उचल म्हणजे याचे लिंग वा-यात धान्य पाखडताना सूप जसे वर उचलले जाते तसे वर उचलेल. नंतर चौथा जोडा होता नामक ऋत्विज व परिवृक्ता नामक राजपत्नी यांचा रंगभूमीवर येतो. होता म्हणतो, हिच्या आखूड योनीत ठोले लिंग जेव्हा हा मनुष्य ठासतो, तेव्हा गाईच्या पावलांभर पाण्यातील जशी माश्यांची जोडी न बुडता बाहेर राहते तशी याच्या अंडांची जोडी हिच्या योनीबाहेर लोंबकळत रहाते. याला उत्तर म्हणून परिवृक्ता म्हणते, अहो तुम्ही शहाणे लिंगपूजक हो! तुम्ही जेव्हा योनीत बुळबुळीत लिंग सारता, तेव्हा खरेच तुम्हाला सांगते की, तुमच्या मांड्याखालून योनी लिकलिकते. पाचवी जोडी क्षत्ता व पालागली यांची. क्षत्ता पालागलीला म्हणतो, हरीण रानातले गवत टाकून शेतातले जव जेव्हा चोरून खाते तेव्हा त्याला पोट भरलेसे वाटत नाही. शूद्रीण जेव्हा वैश्याशी चोरून रत होते तेव्हा तिचे समाधान होत नाही. पालागली क्षत्त्याला उत्तर करते, खरेच आहे. हरीण चोरून जव खाते तेव्हा त्याला पोट भरलेले वाटत नाही. शूद्र पुरुष वैश्य स्त्रीशी जेव्हा रममाण होतो तेव्हा त्याची तरी तृप्ती कोठे होते ?