Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

ह्या सहाही वाक्यांत अग्नीने उपासकांस प्रजा द्यावी, पुत्र द्यावे, वीरसंतती द्यावी, अशी प्रार्थना केली आहे. पाचव्या वाक्यात तर आमचा हा यज्ञ प्रज्ञावान् होवो, अशी उत्कंठा दर्शविली आहे. प्रजा किंवा पुत्र दोन प्रकारचे असत. (१) पुंस्पुत्र व (२) स्त्रीपुत्र. पुत्र ह्या पुल्लिंगी शब्दाने मुली व मुलगे ह्या दोन्हींचा बोध ऋषिपूर्वजांच्या भाषेत होई. अग्नी प्रजा कशी देई, व यज्ञ पुत्रवान् व प्रजावान् कसा होई ही पृच्छा तृप्त व्हावयाची म्हणजे ऋषिपूर्वजांच्या समाजात पुरातनकाली जी एक चाल प्रचलित असे तिचे वर्णन करणे जरूर आहे. ऋषिपूर्वज थंड हवेच्या प्रदेशात राहत असत. दिवसा श्रमसाहस व स्वारी-शिकार केल्यावर उबा-याकरिता धगधगीत धुमीच्याभोवती येऊन बसत आणि तेथे ते पाशवावस्थ स्त्रीपुरुष ऋषिपूर्वज यभनक्रिया करीत. धुमीभोवती ऊर्फ अग्निकुंडाभोवती अतिप्राचीन आर्य स्त्रीपुरुष यभनक्रिया करीत. या विधानाला पोषक असे कृष्णयजुर्वेदातील व शुक्लयजुर्वेदातील साक्षात् काही मंत्र देतो व काही मंत्राचे तात्पर्य देतो. यजुर्वेदातीलच मंत्रावतरण करण्याचे कारण असे की ह्या वेदाचा मुख्य विषय त्याच्या नावाप्रमाणे यजुस् म्हणजे यज्ञ हा आहे. यजुर्वेदात अग्नी चेतवून यज्ञ कसे करावे, कां करावे व यज्ञांची फलनिष्पत्ती काय, ह्या तीन बाबींचे ख्यापन केलेले आहे, व प्राधान्येकरून अग्नीचे स्तोम गायिलेले आहे.