Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
नमूद करून ठेविल्या आहेत, अज्ञानाने काहीतरी भोळसटपणा केलेला नाही. हर्यश्व व युवनाश्व असे दोघे भाऊ होते व या दोन भावांना एक बहीण होती. हर्यश्वाचा मुलगा जो यादववंशस्थापक यदु ह्याने आपल्या बापाच्या बहिणीच्या पाच मुलींशी शरीरसंबंध केला ( हरिवंश, अध्याय २३७ ). येथे आतेबहिणीशी संबंध झाला. वरील सर्व अवतरणांचा मथितार्थ असा की प्राचीन काळी आर्यंसमाजात सख्खी बहीण, चुलत बहीण, नात, सख्खी मुलगी व आतेबहीण यांच्याशी शरीरसंबंध आर्ष लोक करीत असत. यात बरेच नातगोत गोविले गेले हे खरे, परंतु ह्याहून आश्चर्यकारक चाली महाभारतात वर्णिल्या आहेत. महाभारताच्या आदिपर्वाच्या ४५ व ४६ या अध्यायांत अर्जुन व ऊर्वशी यांच्या भेटीचा वृत्तान्त दिला आहे. ऊर्वशी ही पौरववंशाची जननी आणि अर्जुन हा तिचा वंशज. असे असून भेटीच्या वेळी ऊर्वशीने अर्जुनाजवळ भोगयाचना केली ती अर्जुनाने फेटाळली; कारण अर्जुनाचा पूर्वज जो ऊर्वशीपती पुरूरवा त्याच्या काळच्या नीतींत व अर्जुनाच्या काळच्या नीतीत बहुत अंतर पडून प्रगती झाली होती. ऊर्वशी ही जुनाट स्त्री पुराणप्रिय असल्यामुळे ती पुरातन नीतीला अनुसरणारी होती. ती अर्जुनाला म्हणते, “ मला तू असा फेटाळू नको, पुरूच्या वंशातील आमचे जे पुत्र व पौत्र येथे इंद्रलोकी येतात ते आमच्याशी रमतात आणि त्यांना कोणी दोष देत नाहीत, तेव्हा तूही मजशी रमलास तर तुलाही त्यात काही दोष नाही." अशी पुरातन नीति यद्यपि ऊर्वशीने आपल्या वंशजाला सांगितली तत्रापि नीतिसुधारक अर्जुनाने ती मान्य केली नाही. तेव्हा संतप्त होऊन ऊर्वशीने अर्जुनाला शाप दिला की, तू माझा आदर केला नाहीस सबब वर्षभर षंढ होशील. हे उदाहरण मातृगमनाचे किंवा मातामहीगमनाचे किंवा प्रमातामहीगमनाचे, असे वाटेल त्याचे समजावे; कारण, अर्जुन हा इंद्राचा मुलगा व ऊर्वशी ही इंद्राची भोग्य अप्सरा, या दृष्टीने ऊर्वशी अर्जुनाची माता ठरते; आणि अर्जुनाचा पूर्वज जो पुरूरवा त्याची स्त्री म्हणून प्रमातामही ठरते. तात्पर्य मात्रागमनाची चाल पुरातन भारतीयात होती. त्या काली माता, पिता, भाऊ, बहीण, नात, मुलगी, चुलतबहीण, आतेबहीण वगैरे नाती उत्पन्न झालेली नव्हती. यावरून अत्यंत पुरातन भारतीय पूर्वज किती रानटी स्थितीत होते त्याचा वर्तमानकालीन कित्येक रानटी समाजांशी तुलना करिता, अंदाज करता येतो.
The Chippeways frequently cohabit with their mothers and oftener still with their sisters and daughters. Kadiaks unite indiscriminately, brothers with sisters and parents with children. The Caribs married at the same time a mother and a daughter. The ancient Irish married, without distinction, their mothers and sisters (Letourneau, page 65-66 ).