Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(३) हरिवंशाच्या दुस-या अध्यायात वर्णन आहे की वसिष्ठ प्रजापतीची मुलगी शतरूपा ही वयात आल्यावर आपला पिता जो वसिष्ठ त्याच्याशी पत्नीभावाने राहिली. तसेच ह्याच ग्रंथाच्या दहाव्या अध्यायात असे विधान केले आहे की मनूने आपली मुलगी इला इजशी शरीरसंबंध केला. त्याचप्रमाणे इतिहासाच्या सत्ताविसाव्या अध्यायात असे लिहिले आहे की जन्हूची मुलगी जी जान्हवी गंगा हिने आपला बाप जन्हू यालाच आपला पती केले. ह्या तीन ऐतिहासिक उदाहरणांचा अर्थ असा की बाप आणि त्याच्या पोटची मुलगी यांचा शरीरसंबंध अतिप्राचीन आर्ष काली होत असे व तो तत्कालीन समाजमान्य असल्यामुळे निंद्य किंवा गर्ह्य मानला जात नसे. ही ऐतिहासिक विधाने निव्वळ भाकडकथा आहेत किंवा वास्तविक घडलेली वृत्ते आहेत या बाबींचा पडताळा व पाहण्याची इतर साधने उपलब्ध आहेत. ऋग्वैदिक अशी एक समजूत सर्वमान्य आहे की सूर्याची दुहिता जी उषा ऊर्फ सरण्यू तीच सूर्याची भार्या होती. यास्कृकृत निरुक्तांच्या पाचव्या अध्यायाच्या सहाव्या खंडात उषाः सूर्यो वृषाकपायी सरण्यूः ही चार उषस्ची नावे दिलेली आहेत.
प्रजापति र्वै स्वां दुहितर मध्यायत् । (ऐ. ब्रा. पं. ३ अ. ३ खंड ३३)
ह्या ऐतरेय ब्राह्मणवचनांत हाच अर्थ स्पष्ट सांगितला आहे. पितृदुहितृसंबंधाचा हा वैदिक पुरावा झाला. स्मृतिग्रंथातही ह्या चालींची म्हणजे बापाचा स्वत:च्या मुलीशी संबंध होण्याची ज्ञापके आढळतात. वसिष्ठसंहिता ही एक जुनाटातली संहिता म्हणजे स्मृतिग्रंथ समजतात. ह्या संहितेत कानीन म्हणून ज्याला म्हणतात त्या पुत्रासंबंधाने खालील वाक्ये आली आहेतः
" कानीनः पंचमः । या पितृगृहे
असंस्कृता कामादुत्पादयेत्
मातामहस्य पुत्रो भवतीत्याहुः ।
।। अथाप्युदाहरंति ।।
अप्रत्ता दुहिता यस्य पुत्रं विंदति ,तुल्यतः ।।
पुत्री मातामहस्तेन दद्यात्पिंडं हरेद्धनं ।।१।।