Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

मद्र व वाहीक इत्यादी निंद्य देशांच्या प्रगतीला कर्ण प्रस्थल, गांधार, आरट्ट, खस, वसाति, सिंधुसौवीर, कारस्कर, माहिषक, कालिंग, केरल, कर्कोटक, वीरक या देशांनाही बसवितो. पैकी कारस्कर, माहिषक, केरल, कर्कोटक व वीरक हे दक्षिणेकडील देश आहेत. वीरक म्हणजे बहुशः करवीरक असावे. या निंद्य देशांची गणना येथेच संपली नाही. त्यात सुराष्ट्राचीही गणना कर्ण करतो. कर्णमते सुराष्ट्रांतील लोक संकरवृत्ति आहेत .(कर्ण-४५). देशांची नावनिशी संपविताना कर्ण म्लेंच्छ समाजांना विसरला नाही. तो म्हणतो, म्लेंच्छ मानवजातीला लांछन, औष्ट्रिक म्लेंच्छांना लांछन, षंढ औष्ट्रिकांना लांछन, आणि राजपुरोहित षंढांना लांछन (कर्ण-४५). म्लेंच्छ म्हणजे अस्पष्ट भाषा बोलणारे भारतवर्षातील व भारतबाह्य देशांतील लोक. हा म्लेंच्छसमाज कर्णकाली स्त्रीपुरुषसंबंधात अत्यंत अनाचारी होता. पाच हजार वर्षापूर्वीचा कर्णच तेवढा म्लेच्छांची निंदा करतो असे नाही, आधुनिक प्रवाश्यांनी, पुराणेतिहाससंशोधकांनी व प्राचीन ग्रीक व रोमन इतिहासकारांनी ह्या लोकांची अशीच वर्णने केलेली आहेत.

Yazidies, a sect of Arabs, unite in the darkness without heed as to adultery or incest (Letourneau 44) Justin and Tertullian tell that the Parthians and Persians married their own mothers. In ancient Persia, religion sanctified the union of a son with his mother,

[व्यभिचार किंवा आप्तसंबंध याचा विचार न करता याझीदी, अरबातील एक पंथ, अंधारात संभोग करतात (लिटोर्न्यू-४४). जस्टिन आणि टेर्ट्युलियन असे सांगतात की, पार्थियन आणि पर्शियन आपल्या स्वतःच्या आईशी विवाह करीत. जुन्या पर्शियात मुलगा आणि आई यांच्या विवाहाला धर्माने मान्यता दिली होती.]
ही वर्णनमाला आणीक हवी तितकी वाढविता येईल. "व्यभिचारियासी मल्याळ देश" म्हणून मुक्तेश्वर आपल्या भारतात मल्याळ ऊर्फ मलयदेशाची कुत्सा करतो वर्तमानकाळी महाराष्ट्रात कोल्हाटी म्हणून लोक आहेत, त्यांच्यातील स्त्रियांची व नीतीची पूर्ण फारकत असलेली आढळून येते. येणेप्रमाणे म्लेंच्छ लोकांच्या नीतीसंबंधाने सर्वसामान्य हकीकत आहे. पैकी कर्णाचा कटाक्ष, गंधार, मद्र या देशांच्या बाजूच्या म्लेंच्छ लोकांवर मुख्यतः असलेला दिसतो. सभापर्वात (अध्याय ३१) माहिष्मतीनगरीत स्त्रिया स्वच्छंद वागतात म्हणून वर्णन आहे. उत्तरकुरूंत, म्हणजे जेथून कौरवपांडव मूळ आले त्या देशात, स्त्रिया स्वच्छंदाने वागतात आणि नरनारींमध्ये तत्संबंधाने मत्सरबुद्धी वास करीत नाही, असे अनुशासन पर्वाच्या १०२ व्या अध्यायात वर्णन आहे.