Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

१३. कुंतीला कर्ण कन्या असताना झाला व तिने लोकलज्जेस्तव लपविला, असला पुत्र मान्य नव्हता.
१४. प्रत्येक हिंदू नवरी इंद्राग्नी इत्यादी ५ देवतांशी प्रथम लग्न करते व नंतर ख-या नव-याशी लग्न करते. दमयंतीनेही असेच केले.
१५. वडील भावाच्या किंवा बहिणीच्या अगोदर धाकट्या भावाचे किंवा बहिणीचे लग्न करीत नाहीत, केलेच तर गौण मानतात.
१६. देवांनी मानवस्त्रीशी संग केला असता मानव तो अनुग्रहच समजत. ही समजूत अद्यापही आहे. १७. सुदर्शनाची आतिथ्याची गोष्ट- याने आपली बायको रतिसुखार्थ पाहुण्याला दिली व त्याबद्दल त्याची अमरकीर्ति झाली (अनुशासन पर्व अ. २).
१८. ऋचिकाने गाधीला १००० घोडे शुल्क म्हणून सत्यवतीकरता दिले (अनुशासन पर्व अध्याय ३-४). स्वयंवरांतील पण इत्यादी शुक्लच आहेत.
१९. श्रूयते हि पुराणेपि जटिला नाम गौतमी ॥
ऋषीनध्यासितवतीसप्त धर्मवृतां वरा ॥ १४ ॥
तथैव मुनिजा वार्क्षी तपोभिर्भावितात्मनः
संगताभूद्दश भातृनेकनान्मः प्रचेतसः ॥ १५ ॥
(आदिपर्व अध्याय १९८ संपूर्ण वाचा)
(polyandry एक बंधु स्त्रीशी एकान्तांत असता दुस-याने त्याला पाहू नये असा पांडवांचा निर्बंध) (आदि २१२).
२०. प्रेष्याः संप्रददै कृष्णो नानादेश्यः सहस्त्रशः १६ ॥
(आदि पर्व, अध्याय २०१).
२१. उत्तंक व वेद यांची कथा- उत्तंकाला आश्रमस्त्रिया गुरुच्या अभावी गुरुपत्नीचा ऋतु सफल करण्यास सांगतात ते तो नाकारतो. आल्यावर गुरु त्याला शाबासकी देतो. परंतु आश्रमस्त्रियांना काहीच दोष देत नाही. त्यावरून गुरुपत्नीशी ऋतुकाली समागम करणे गुर्वभावी शिष्याला विहित धरलेले होते. हे गुरुपत्नीगमन म्हणजे एका प्रकारचे मातृगमनच होते. इ. इ. इ. (आदिपर्व).
२२. सत्यवतीला कन्यकावस्थेत व्यास झाला. कर्णाप्रमाणे कानीन
(आदिपर्व, अध्याय ६०).
२३. व्यास जनमेजयाच्या सभेत गेले असता त्यांना मधुपर्कपूर्वक गाय अर्पण केली, परंतु ती अवध्य म्हणून त्यांनी मारली नाही. म्हणजे गाय मारण्याची चाल पूर्वी एकदा होती. ती भारतकाली बंद झाली होती (आदिपर्व अध्याय ६०).