Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

अंबे व अंबिके ही दोन रूपे तिन्ही पाठांत एकसारखी आहेत. अंबे हे रूप तिन्ही पाठांत पाहिले आहे. अंबिके हे रूप कृष्णपाठात व पाणिनीय पाठात शेवटचे आहे व शुक्लपाठांत दुसरे आहे. कृष्णपाठात अंबालि असे रूप शुक्लपाठात अंबालिके असे रूप व पाणिनिपाठात अंबाले असे रूप आहे. अंबालि हे अंबाली शब्दाचे संबोधन आहे. अंबाले हे अंबाला किंवा अंबालि या शब्दाचे संबोधन आहे व अंबालिके हे अंबालिका शब्दाचे संबोधन आहे. शब्दरूपात व पाठक्रमात हे असे तीन प्रकार आहेत. यावरून स्वच्छच अनुमान निघते की, यजुःसंहिता शुक्ल असो, कृष्ण असो, तिचे पाठ नियत नाहीत. म्हणजे यजुःसंहिता शुक्ल व कृष्ण अशी जी सध्या उपलब्ध आहे ती मूळ जशी रचली गेली असेल तशीची तशी आपल्यापर्यंत पोहोचली नाही. तिच्यातील शब्दात व शब्दक्रमात रूपांतरे झालेली आहेत. शिवाय, पाणिनीय सूत्रावरून (६-१-११८) असेही दिसते की, पाणिनीला यजुःसंहितेत स्वरसंधीच्यासंबंधी जे नियम माहीत होते ते नियम सध्या उपलब्ध असलेल्या कृष्ण यजुःसंहितेत व शुक्ल यजुंसहितेत यद्यपि पाळिलेले आहेत तथापि युक्तीने पाळले आहेत.