Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
आपो जुषाणो इत्यादि सूत्रात पाणिनी सांगतो की, अंबे, अंबाले, अंबिके या तीन शब्दांतील आद्य अकारापूर्वी एकार आला असता पूर्वरूप एकादेश यजुषि होत नाही. प्रकृतिभावच राहतो, म्हणजे संधी होत नाही. या नियमाप्रमाणे पाणिनीला संमत असलेल्या यजुःसंहितेत अंबे अंबाले अंबिके असा संधिरहित पाठ होता. तो पाठ सध्याच्या कृष्णयजुःसंहितेत म्हणजे तैत्तिरीय संहितेत अंबे अंबाल्यंबिके असा फिरवून म्हणजे अंबालेच्या अैवजी अंबालि असे संबोधक रूप घालून, पाणिनीय उपदेशाची अवहेलना केलेली स्पष्ट दिसत आहे. पाणिनीने अंबे, अंबिले व अंबिके अशी तीन रूपे सांगितली आहेत, त्यांचा अर्थ सध्यांच्या तैत्तिरीयसंहिताकारांनी असा केला की अंबाले हे रूप असेल तरच पुढील अकाराचा पूर्वरूप-एकादेश होईल, अंबालि असे ज्या अर्थी आमचे रूप आहे त्याअर्थी हा नियम आम्हाला येथे लागूच नाही. पाणिनीय नियम टाळण्याची ही अशी चोरवाट नवीन तौत्तिरीयसंहिताकरांनी काढली खरी, परंतु पाणिनीच्या कचाट्यातून ह्या कच्च्या गुरूंच्या चेल्यांना निसटता आले नाही. अंबालि असे रूप मानून अंबाल्यंबिके असा संधी त्यांना उजळ माथ्याने करता आला, परंतु अंबे व अंबालि या शब्दाचा प्रकृतिभाव ठेवून म्हणजे संधी न करून त्यांनी आपले हसे करून घेतले.