Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
लग्नसंस्था : (एक टिपण)
(भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या विषयावर कै. राजवाडे यांनी लिहिलेली चार प्रकरणे आतापर्यंत दिली. आता त्या मालेपैकी आणखी प्रकरणे उपलब्ध नाहीत, पण याच विषयावर लग्नसंस्था या मथळ्याखाली त्यांनी लिहिलेले टिपण यापुढे दिले आहे.
-संपादक)
१. ब्रह्मदेव आपल्या मुलीशी गेला.
२. यम व यमी ही बहीणभावंडे नवराबायको झाली.
३. चंद्र बृहस्पतीची बायको तारा इशी गेला (वन. २१९) गुरूतल्पग.
४. पाराशर्याने सुगंधीशी गमन केले.
५. कृष्णाला १६००० गोपी स्त्रिया होत्या.
६. तरी मोहिनीकरिता वृंदावनात कृष्णाने घर केलेच.
७. विभांडिकाने मृगीशी संग केला. (formication with beasts) (वन ११०) अश्वरूप धारण करणारी त्वाष्ट्री ही सूर्याची भार्या (आदि ६६). दमाने मृगीशी संग केला (आदिपर्वं पृष्ठ ११). मृगवेशाने पत्नीशी व्यवहार, पांडूने मारलेले मृगदंपत्य, मृग ऋषि होता (आदि ११८).
८. द्रौपदी-एक स्त्री सर्व भावांची बायको. जो भाऊ खोलीत असेल त्याची खूण बाहेर ठेवीत, म्हणजे दुसरा आत जात नसे.
९. सीता-एकेक बहीण एकेक भावाची बायको.
१०. चिरकारीची कथा : गौतमाने व्यभिचारी स्त्रीस-चिरकारीच्या मातुःश्रीस- मारण्यास चिरकारीला सांगितले, परंतु त्याने तिला मारिले नाही (शांतिपर्व २६६ अध्याय) आईची माया राखिली.
११. परशुरामाची कथा- याने आईला मारिले, बापाची आज्ञा मान्य केली.
१२. कुंतीने तीन वेळा व माद्रीने एकदा नियोग केला, व तो नव-याच्या परवानगीने केला.