Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
या वाक्यांचा भावार्थ असा : अग्निहोत्री यजमान अग्नीत दूध, दही, तूप वगैरे पदार्थ टाकतो ते फुकट जात नाहीत. योनींत टाकलेले रेत ज्याप्रमाणे तेथे जमा होते त्याप्रमाणे अग्नीत टाकलेले पदार्थ रेतोरूप होतात, कारण अग्नी म्हणजेच जननेंद्रिय. सायंकाळी हवन करणे म्हणजे रेतसिंचन करणे आहे, आणि प्रातःकाळी हवन करणे म्हणजे सायंसिक्त रेतापासून झालेली प्रजा संपादणे आहे.
यज्ञभूमीवर ऋषिपूर्वजकाली काय प्रकार चाले तो विशद करणारे आणिक एक वाक्य तैत्तिरीय संहितेच्या सातव्या कांडाच्या पाचव्या प्रपाठकाच्या दहाव्या अनुवाकातील देतो :
यंति वा एते मिथुनाद् ये
संवत्सरं उपयंति अंतः वेदि
मिथुमो सं भवतः तेनैव
मिथुनान्न यंति
ह्या मंत्राचा भावार्थ असा आहे की, जे यजमान संवत्सर सत्राचे अनुष्ठान करतात त्यांची मैथुनशक्ती मंद होते, कारण वर्षभर ते ब्रह्मचर्याने राहतात. करिता मैथुनशक्ती पुनः प्रज्वलित व्हावी एतदर्थ ईश्वराच्या अघटित लीलेने बेदीच्या मध्ये एक जोडणे उत्पन्न होते. ते जोडणे कोणाचे म्हणाल तर एका ब्रह्मचा-याचे व एका छिनाल वांडकीचे. त्या जोडप्याचा मैथुनव्यवहार पाहिला म्हणजे वर्षभर ब्रह्मचर्याने राहिलेल्या यजमानाची मैथुनशक्ती पुन्हा पूर्ववत् जोराने प्रगत होते. मैथुन या भाववाचक नामाचे कार्य मिथुन हा शब्द तैतिरीय संहितेत करतो.
यजमानाने वर्षभर ब्रह्मचर्याने राहावयाचे व्रत वैदिककाळी निघाले. तत्पूर्वी वेदीवर म्हणजे आगटीभोवती म्हणजे जमातींच्या जागी स्त्रियांच्या पाठी लागणारे पुरुष व पुरुषांच्या पाठी लागणा-या स्त्रिया यथेच्छ रममाण होत. ज्या मालकाची आगटी असेल त्याच्या स्त्रिया आलेल्या पाहुण्याशी रममाण होत, व तोपर्यंत स्वतः यजमान अतिथिसत्कारार्थ स्वतः ब्रह्मचर्याने राही. अतिथीला स्वस्त्री समर्पण करण्याची जी चाल वैदिक ऋषिलोकांत पुढे चालू होती तिचे दर्शक यजमानाचें हे काही कालपर्यंतचे ब्रह्मचर्य होय.