Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

८. अग्नी व प्रजोत्पादन यांचा नित्यसंबंध दाखविणारी हवी तितकी वाक्ये ऋग्वेद व यजुर्वेद यांच्यातून काढून दाखविता येतात. प्रजननं ज्योतिः (तै. सं. कांड ७, प्रपाठक १, अनुवाक १) या वाक्यात पुरुषजननेंद्रियाला अग्नीची ज्योत म्हटले आहे. गर्भो वा एष यदुख्यः (तै. सं. ५-६-१०) या वाक्यात अग्नीला गर्भ म्हटले आहे. गर्भ, योनी, रेत, मुष्क, अंजि, प्रजनन, प्रजापती, मेंदू , इंद्रिय, वृष, वृषण, वृषभ, वीर्य इत्यादी शब्द -ज्यांचा उच्चार करणे आपणा सर्वांनाच अश्लील व असभ्य वाटते-ते शब्दः यजुःसंहितेत अग्नीच्या सानिध्याने पदोपदी आलेले आढळतात. प्रजोत्पादक इंद्रिये ही अग्नी आहेत, अशी रानटी ऋषिपूर्वजांची कल्पना असे. शिवाय रानटी ऋषिपूर्वज यभनकर्म उघड्यात सर्वोदेखत करीत, त्यात काही लज्जास्पदता त्यांना वाटत नसे. अर्थात् यभनक्रियेचे वाचक शब्द व अवयव यांचा उच्चार करण्यात कोणताही अश्लीलपणा आहे, असे त्यांना वाटत नसे. नाक, डोळे ही उघडी ठेवण्यात आपणास जशी लाज वाटत नाही, त्याप्रमाणेच जननेंद्रिये उघडी ठेवणे रानटी ऋषिपूर्वजांना लज्जेची गोष्ट वाटत नसे. म्हणजे रानटी ऋषिपूर्वज एकेकाली बरेच नग्न असत व जननेंद्रिये, रेत, गर्भ इत्यादीवाचक शब्द त्यांच्या बोलण्यात हरघडी येत. तैत्तिरीय संहितेच्या पहिल्या कांडाच्या पाचव्या प्रपाठकाच्या नवव्या अनुवाकांत अग्नी, योनी व लिंग याजसंबंधाने ऋषिकल्पना अर्थात् ऋषिपूर्वजकल्पना काय होत्या ते सांगितले आहे.

अग्निहोत्रं जुहोति, यदेव किं च
यजमानस्य स्वं तस्यैव तत् । रेतः
सिंचति प्रजनने प्रजननं हि वा अग्निः ।
यत्सायं जुहोति रेत एव तत्सिंचति ।।
प्रैव प्रातस्तनेन जनयति तत् ॥