Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
७. अग्निचयन व प्रजोत्पादन यांचे साहचर्य रानटी ऋषिपूर्वजांत किती पराकाष्ठेचे निकट होते ते तैत्तिरीय संहितेतील एक उतारा देऊन आणिक स्पष्ट करितो.
नाग्निं चित्वा रामां उपेयाद्
अयोनौ रेतो धास्यामीति,
न द्वितीयं चित्वा अन्यस्य स्त्रियं
उपेयान् , न तृतीयं चित्वा
कांचन उपेयाद्, रेतो वा एतन्नि
धत्ते यदग्निं चिनुते, यदुपेयाद्रेतसा व्यृध्येत.
(तैतिरीयसंहिता, ५ कांड, ६ प्रपाठक, ८ अनुवाक)
एका ऋषीचे मत असे होते की, पहिल्यांदा अग्निचयन केले असता, स्त्रीसमागम करू नये, कारण अनुपयुक्त स्त्रीच्या ठायीं रेत स्थापिण्यात काही मतलब नाही, दुस-यांदा अग्निचयन केले असता दुस-यांच्या स्त्रीशी गमन करू नये, आणि तिस-यांदा अग्निचयन केले असता कोणत्याच स्त्रीशी गमन करू नये; निषेधाचे कारण असे आहे की, अग्निचयन करणे म्हणजे रेत साठविणे आहे, तेव्हा स्त्रीसमागम केला असता रेताचा व्यर्थ क्षय होतो.