Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

५४ त्रिवचन ऊर्फ बहुवचन ऊर्फ अनेकवचन प्राथमिक भाषेत नसल्याचे ज्याप्रमाणे वच् व आह् याधातूच्या लंगडेपणावरून आपणास प्रत्यक्ष दाखविता आले, त्याप्रमाणे प्राथमिक भाषेत त्याहूनही पूर्वकाली द्विवचनही निर्माण झाले नव्हते हेही दाखवून देण्यास एक प्रमाण आहे. मुळची प्राथमिक भाषेतील बोलण्याची पद्धती म्हटली म्हणजे अविकृत शब्दापुढे शब्द उच्चारून अर्थ प्रदर्शित करण्याची. वक्ति हे संस्कृत वाक्य प्राथमिक भाषेत वच् त् इ असे उच्चारीत. बोलणे याअर्थीं वच् हा धातू, तो ह्न ती ह्न ते याअर्थी त् हे सर्वनाम हा ह्न ही ह्न हे याअर्थी इ हे सर्वनाम, असे तीन शब्द या वाक्यात आहेत. वच् त् इ या वाक्याचा अर्थ तो हा बोलतो असा आहे. येथे वच् हा धातू जशाचा तसा अविकृत योजिला आहे. त्याला लिंग, वचन वगैरेची विकृती बिलकूल झालेली नाही. कालांतराने वच् त् इ हे वाक्य लाखो वेळीं बोलण्यात येऊन वक्ति असे संहित उच्चारिले जाऊ लागले व मुळचे तीन शब्दाचे हे वाक्य आहे ही बाब अजिबात स्मरणातून गेली. वक्तिप्रमाणे वक्तस् हेही प्राथमिक भाषेतील वाक्य आहे. त्या भाषेत वच् त् अस् असे वाक्य असे. त् व अस् हीर एकार्थक सर्वनामे उच्चारून ते दोन, ते दोघे असे द्वित्वदर्शन प्राथमिक मनुष्य करी. त् + अस् = तस् तस् म्हणजे ते दोघे वच् तस् म्हणजे ते दोघे बोलतात. वच् तस् ची संहिता कालांतराने वक्तस् = वक्त: अशी होऊन, हे मुळात वाक्य होते या बाबीच विस्मृती झाली. वक्तस् = वच् तस् या वाक्यात वच् धातू जशाचा तसा अविकृत योजिला आहे, त्याला वचनाचा प्रत्यय लागला नाही. त् इ च्या पाठीमागे जसा वच् हा उघडानागडा अविकृत धातू योजीत्, तसाच तस् (ते दोघे) या द्वित्त्वदर्शक द्वित्त सर्वनामा मागे वच् हा साधा धातू उघडानागडा योजीत. तात्पर्य, प्राथमिक भाषेचा असा एक काल होता की या काळी मुदलात वचनप्रत्यय व संख्याशब्द अस्तित्वात आले नव्हते. अर्थात्, द्विवचन व एकवचन या कल्पना त्याकाळी उद्भवण्याचा संभवच नव्हता.