Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
५५ लिंगकल्पना व वचनशब्द ऊर्फ संख्याशब्द ज्याकाळी प्राथमिक भाषेत उद्भवल्या नव्हत्या त्याकाळी धातुशब्द पुढे सर्वनामे व सामान्यनामे उच्चारून वाक्य बनवीत व अर्थ व्यक्त करीत. कालांतराने भाषेत वचनकल्पना व वचनशब्द किंवा संख्या दाखविण्याचा रीती निघाल्यानंतर, धातुशब्द पुढे वचनशब्द व संख्याशब्द योजीत. प्राथमिक आर्य संख्या दोन तऱ्हांनी व्यक्त करीत. संख्या व्यक्त करावयाची पहिली तऱ्हा प्राथमिक आर्यांना जी प्रथम सुचली ती अशी की, ज्या वस्तूचे संख्याद्वयत्व दाखवावयाचे असेल त्या वस्तूच्या वाचक शब्दापुढे एकार्थक दोन सर्वनामे उच्चारावयाची व ज्या वस्तूचे संख्यामात्रयत्व किंवा संख्याचतुष्टयत्व किंवा संख्यापंचकत्व दाखवावयाचे असेल त्या वस्तूंच्या वाचक शब्दापुढे तीन चार किंवा पाचदर्शक सर्वनामे उच्चारावयाची. रानटी आर्यांची संख्यागणनाची मजल दोन या संख्येपर्यंत जेव्हा गेली तेव्हा त्यांनी ही पहिली तऱ्हा शोधून काढली. क्रियापदरूपात या तऱ्हेची उदाहरणे येणेप्रमाणे : वच् + तस् = वक्तस्. तस् म्हणजे तो आणि तो किंवा ते दोन अथवा ते दोघे, अवच् + ताम् ताम् हा जोड शब्द त् + आम् मिळून झालेला आहे. त् म्हणजे तो एक. आम् = अ + अम्. अ म्हणजे हा व अम् म्हणजे तो. आम् म्हणजे हा तो. अम् म्हणजे ते (दूरचे) ते. त् म्हणजे नुसते दूरचे ते. त + आम् म्हणजे दूरचे ते दोघे. अवक्ताम् म्हणजे ते दोघे बोलतात. भव् + अन् + त् + इ = भवन्ति, अन् म्हणजे दुसरा तू म्हणजे तो व इ म्हणजे हा. भवन्ति म्हणजे तो, हा व दुसरा आणिक एक असे तिघे होतात. येथे तीन सर्वनामे योजिलेली आहेत. चार किंवा पाच सर्वनामे धातुशब्द पुढे योजिल्याची उदाहरणे पुढे घ्यावयाची आहेत. सबब वस्तूंचे द्वित्व किंवा त्रित्व दाखविण्याच्या या पहिल्या रीतीचा येथे इतकाच खुलासा करून संख्यानेकत्व दाखविण्याच्या दुसऱ्या तऱ्हेकडे वळतो.