Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

+ तिङंत विचार
धातूचे पृथक्करण

५२ सुबन्तप्रक्रियेत क्रियापदांना कार्याकारण स्पर्श मात्र केला. येथे क्रियापदांचे पृथक्करण बारकाईने करावयाचे आहे. क्रियापदरूपे होताना धातूंच्यापुढे जे प्रत्यय संस्कृत किंवा वैदिकभाषेत लागतात ते मूळात उत्तम ह्न मध्यम ह्न किंवा प्रशम ह्न पुरुषवाचक सर्वनामे आहेत. या सर्वनामांना कारकाचे प्रत्यय लागत नाहीत. तसेच, स्त्री ह्न पुं ह्न किंवा नपुंसक लिंगाचे प्रत्ययही या सर्वनामांना लागत नाहीत. याचा अर्थ असा होतो की कारकाचे किंवा लिंगाचे प्रत्यय ऊर्फ शब्द निर्माण होण्याच्या पूर्वी क्रियापदांची रूपे पूर्ववैदिकभाषेत बनून गेलेली होती. करोमि, करोषि, करोति या तीन रूपातील मि, सि व ति ही जोड सर्वनामे स्त्री, पुरुष व नपुंसक या तिन्हीपैकी वाटेल त्या लिंगाची दर्शक आहेत व होती. म्हणजे मूळात मि, सि व ति ही सर्वनामे भाषेत लिंगकल्पना उत्पन्न होण्याच्या पूर्वीची आहेत. प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत धातुशब्दाच्या पुढे ही मि, सि व ति, सर्वनामे उच्चारीत. जसे अद् मि, अद् सि, अद् ति, ति हे लिंगविहीन सर्वनाम तो ती ते या तिन्ही लिंगी योजिले जाई. हाच प्रकार मी मि व सि या सर्वनामांचा असे. अद् मि, अद् सि व अद् ति ही प्राथमिक भाषेत सबंध वाक्ये असत व त्यांचा अर्थ मी खातो, तू खातोस व तो ती ते खाते असा असे. पुढे ही प्राथमिक भाषा मृत झाल्यावर अद् मि वगैरे वाक्ये, वाक्ये आहेत ही भावना लुप्त होऊन आणि ही वाक्ये अदिम, अत्सि व अत्ति अशी संहित उच्चारली जाऊन व मि, सि, ति या सर्वनामांना प्रत्ययांचे रूप येऊन, ही रूपे प्राथमिक भाषोप्तन्न द्वितीय पूर्ववैदिकभाषेत धातुरूपे समजली जाऊ लागली. पुढे ति या जोड सर्वनामांतील त् या लिंगविहीन सर्वनामाला लिंगप्रत्यय लागून तृतीयपूर्ववैदिकभाषेत स:, सा, तत् अशी स्त्रीलिंगी पुंल्लिंगी व नपुसकलिंगी रूपे यद्दयपि नवीन प्रघांतात आली, तत्रापि धातूरूपात ति किंवा ते हे लिंगविहीन जोड सर्वनाम प्रत्यय रूपाने जसेच्या तसेच कायम राहिले. उत्तमपुरुषवाचक व मध्यमपुरुष वाचक जी मि व सि जोड सर्वनामे त्यांच्यात स्त्रीपुंनपुंसक असा भेद तृतीयभाषेत उद्भवलाच नाही. तात्पर्य, ति व ते हें सर्वनाम एकेकाळी मि व सि प्रमाणेच लिंगविहीन होते व या लिंगविहीनत्वाची खुण संस्कृतातील प्रथमपुरुषवाचक धातुरूपात राहिलेली आढळत. करोमि, करोषि व करोति या रूपांवरून उघड होते की प्राथमिक पूर्ववैदिकभाषा लिंगविहीन होतो. ति या सर्वनामाची सस् (तसु), सा (त), तत् ही अशी सलिग रूपे पुढे झाली, तशीं उत्तम व मध्यम ह्न पुरुषवाचक हम् व तुहम् सर्वनामांची तिन्ही लिंगी रूपे का झाली नाहीत. असा प्रश्न उद्भवतो या प्रश्नाला उत्तर असे कीक, अहम् किंवा त्वं या सर्वनामांना स:, सा, व तत् हीं सलिंग सर्वनामे जोडून लिंगभेद दर्शविता येण्याची सोय सोहम् साहम्, तदहम्, सत्वम्, सात्वम्, तत्त्वम् अशी झाल्यामुळे उत्तम व मध्यमपुरुषवाचक सर्वनामांची तिन्ही लिंगी स्वतंत्र रूपे बनविण्याची आवश्यकता तितकी राहिली नाही. बाकी अहं गच्छामि किंवा त्वं ब्रवीषि या रूपा करून जाणारी किंवा बोलणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे की नपुसंक आहे हा निर्णय केवळ रूपांवरून होत नाही, जाणाऱ्याच्या किंवा बोलणाऱ्याच्या प्रत्यक्ष दर्शनावरून किंवा इतर ज्ञापकांवरून हा निर्णय करणे शक्य होते. हा संदिग्धपणा संस्कृतातल्याप्रमाणे इतर अनेक भाषात असाच दृष्टोत्पत्तीस येतो. मराठीतसुद्धा मी व तू हे शब्द लिंगाविहीनच आहेत; इतकेच की धातुरूपांवरून क्रिया करणारी व्यक्ती, स्त्री आहे की पुरुष आहे की नपुंसक आहे ते प्राय: ओळखता येते; जसे मी बोलतो (पुं.), मी बोलत्ये (स्त्री), मी बोलते (नपुं). संस्कृत भूतकालवाचक व वर्तमानकालवाचक क्रियापदरूपावरून, मराठीत आलेल्या भूतकालवाचक व वर्तमानकालवाचक रूपांवरून मी व तू यांचे लिंग संस्कृतातल्याप्रमाणेच कळण्यास अडचण पडते; जसे भवामि = मी होई, भवसि = तू होय, अभवम् = मी होई, अभवस् = तू होय, या वाक्यात मी व तू यांची लिगे कळण्यास केवळ रूपांचा उपयोग काही एक होत नाही, इतर ज्ञापकांची मदत लागते.