Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
५८ अन् ने बहुवचन दाखविण्यात व त्रिर्, तृ, रिर, इर्, र् ने त्रिवचन दाखविण्यात मुळचा भेद असा आहे की ह्न रिर्, इर्, र् प्रत्यय फक्त तीन या संख्येचा वाचक आहे, तीन्हीहून जास्त संख्येचा वाचक नाही, परंतु अन् हा शब्द दुसरे, अन्य, अशा सामान्य दोहोहून जास्त कोणत्याही संख्येचा वाचक आहे. रिर्, इर्, र् या प्रत्ययाचे तीन संख्यावाचकत्व कालांतराने विसरले जाऊन, हाही प्रत्यय पुढे दोहोहून जास्त संख्येचा म्हणजे बहूवचनाचा वाचक झाला व अन् च्या बरोबरीने त्याचा उपयोग होऊ लागला. लिटाच्या विधिलिकाच्या व शी धातूच्या सार्वधातुक आत्मनायक प्रथमपुरुषाच्या अनेकवचनात हा र् प्रत्यय पाणिनीय भाषेत अवशिष्ट राहिला. वेदभाषेत बहुतेक सर्व लकारांच्या आत्मनायक प्रथमपुरुषाच्या अनेकवचनात रिर्, इर् किंवा र् प्रत्यय जारीने असलेला आढळतो. दुह्ते, अशेरन्, दुह्ताम् भरेरत, ददीरन् ससृज्रिरे, सेदिरे, विविज्रे, अकृपन्, अदृश्रम्, ददृश्राम्, अचकिरन् इत्यादी बहुतेक सर्व वैदिक लकारात हा प्रत्यय दृश्यमान होतो. पाणिनीय भाषेत हा र् लिटांत व विधिलिङांत तर याक्षातच् दिसतो. परंतु इतरत्र छपून असलेला आढळतो. हा र् इतरत्र कसा छपलेला आहे ते खालील रूपांच्या पृथक्करणावरून दिसून येईल. दुह्ते असे त्कारी रूप त्याच्या जोडीला दुह्ते असेक र विरहित रूप वैदिकभाषेत व पाणिनीय भाषेत आढळते. दुह्ते यारूपात त्रित्व किंवा बहुत्व किंवा अनेकत्व र हा प्रत्यय दाखवितो. त्याप्रमाणे, दुहते यारूपात बहुत्व दाखविणारा अवयव कोणता? दुह्+अ+ते असें पृथक्करण दुहते या रूपाचे आहे. दुह् +र्+अ+ते असे पृथक्करण दुह्ते यारूपाचे आहे. तेव्हा दुहते या रूपात बहुत्व कशाने दाखविले जाते? त्रित्व ऊर्फ बहुत्व दाखविणारा र् किंवा अन् तर दुह्ते यारूपात नाही. प्रश्नाला उत्तर असे आहे की दुह्ते हे रूप दुह्ते यारूपाचा अपभ्रंश आहे. र्चा अ झाला आहे. असा र्चा अ पूर्ववैदिक भाषांत होत असे ही prakritism आहे. उष्ट्रक = ऊट् (गावंढळ मराठी,) राष्ट्रक = रट्ट, आम्र = भांब (गावंढळ मराठी) अभ्रालि = भाभाळ इत्यादी अपभ्रंशातही prakritism सडकून आढळून येते. तीच दुह्ते = दुहते या वैदिक रूपात दृष्टास पडते. अदादि, तनादि, क्रयादि स्वादि व रुधादि वर्गातील धातूंच्या सार्वधातूक आत्मनायक प्रथमपुरुषाच्या अनेकवचनी दुह्ते या सांच्याचे रूप सार्वत्रिक आहे आणि जुहोत्यादिवर्गात तर हा सांचा आत्मनेपदी जसा आढळतो तसा च परस्मैपदीही आढळतो. अदादि वर्गातीलही कित्येक धातूंची परस्पैपद रूपे या सांचाची आहेत. कशते, तन्वत, ऋोणते सुवते, रुंधत, दधते, दघाति, जाग्रति इत्यादी रूपे दुह्कते या सांच्याची आहेत. याचा अर्थ असा की, एकेकाळी पूर्ववैदिक भाषात यासर्व वर्गातील धातूंची परस्मायक व आत्मनायक प्रथमपुरुषांची अनेकवचने रकारयुक्त होती. शास्त्रति, दध्रति, नेनिज्रति अशी परस्मायक रूपे मुळात असत त्यांचे अपभ्रंश शासति दधति, नेनिजति इत्यादी रूपे आहेत.