Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

केवळ साधा मूळ धातू व त्याच्या पुढे सर्वनामे मिळून प्राथमिक भाषेतील वाक्य बनत असे. पुढे मुळधातू व त्यापुढील सर्वनामे यांचा मिलाफ बेमालूम होऊन, सर्वनामांना प्रत्ययांचे स्वरूप आले व ही प्राथमिक वाक्ये कृदन्त शब्द म्हणून कालांतराने प्रचलित झाली. प्राथमिक भाषा अस्तास जाण्याच्या सुमारास समाजात येथून तेथून सर्व धातू अभ्यस्त योजण्याचा क्रम पडला आणि हा क्रम पुढे-पुढे इतका जोरावला व रूढावला की शेकडो अभ्यस्त धातूंचे संक्षेप होऊन ते मूळचे अभ्यस्त आहेत या बाबीची आठवण बुजाली. मूळ साधा धातू व प्रत्ययांचे रूप पावलेले सर्वनाम वैदिकभाषेत फार तुरळक राहिले. बाकीचा क्रियापदांचा प्रांत संक्षिप्त अभ्यस्त धातू व सबंध अभ्यस्त धातू यांनी व्यापला. उदाहरणार्थ, अदिम, अस्मि, यामी, कशे इत्यादी फारच थोडी अविकृत क्रियापदे वैदिकभाषेत शिल्लक राहिली. बाकीची येथून तेथून सर्व रूपे संक्षिप्त अभ्यस्त किंवा सबंध अभ्यस्त धातूंची वैदिक व पाणिनीय भाषेत आढळतात. येणेप्रमाणे धातूंचे पहिले दोन मोठे वर्ग पडतात. १) पहिला वर्ग साध्या धातूंचा व २) दुसरा वर्ग अभ्यस्त धातूंचा. अभ्यस्त धातूंच्या रचनेचे प्रकार पूर्ववैदिककाली निरनिराळ्या पूर्ववैदिक भाषात निरनिराळे असे अनेक असत.*