Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
क्रियापदरूपांना अव्ययत्व आल्याची दुसरी उदाहरणे म्हटली म्हणजे हन्त व स्मा या अव्ययांची. हन्त हे हन् किंवा हा (जाणे) या धातूंचे पूर्ववैदिक रूप आहे व स्म हे अस् धातूंचे पूर्ववैदिक रूप आहे. वैदिक भाषेत ही निव्वळ अव्यये म्हणून राहिलेली आहेत. ही रूपे पूर्ण अव्ययत्व आलेल्या क्रियापदरूपातील होत. अव्ययत्व थोडेबहुत येत चाललेल्या एका क्रियापदरूपाचेही उदाहरण उपलब्ध आहे व ते पाणिनीने आपल्या अष्टाध्यायीत नमूद केले आहे. 'प्रहासे च मन्योपपदे मन्यते रुत्तम एकवच्च' 'एहि मन्ये ओदनं भोक्ष्यसे' या वाक्यात मनू धातूचे उत्तमपुरुषी एकवचनी रूप मध्यमपुरुषाच्या एकवचनाच्या बदला योजिलेले आहे. एत व मन्ये ओदनं भोक्ष्यध्वे या वाक्यात उत्तमपुरुषाचे एकवचनी रूप मध्यमपुरुषाच्या अनेक वचनी रूपाबद्दल योजितात, म्हणून पाणिनी सांगतो. याचा अर्थ असा की, मन्ये हे रूप एकवचनी व अनेकवचनी व द्विवचनी, तसेच उत्तमपुरुषी व मध्यमपुरुषी वाक्यात उपपद म्हणून विकृत न होता अव्ययासारखे अविकृत रहात असे. म्हणजे मन्ये हे क्रियापदरूप पाणिनीच्याकाळी अव्ययासारखे बनत जाण्याच्या मार्गात होते. तात्पर्य, क्रियापदरूपांना अव्ययत्व आलेले पाणिनीयभाषेत, वैदिकभाषेत व पूर्ववैदिकभाषात सारखेच आढळून येते. करता पूर्ववैदिक प्राथमिक भाषेत अह किंवा आह या धातूच्या उत्तमपुरुषाच्या एकवचनी व अनेकवचनी रूपांचा झालेला हा मासला शोधक दृष्टीस प्रतीयमांन झाल्यास तिला त्या चमत्काराचे विशेष आश्चर्य वाटत नाही. येणेप्रमाणे वेदपूर्वकालीन प्राथमिक भाषेच्या द्वैवचनिक अवस्थेत अह्ह्न आह् धातू द्विवचनापर्यतच चाले आणि त्याची उत्तमपुरुषाची दोन्ही वचनरूपे अव्ययोद्गार बनल्यामुळे वैदिक भाषेत त्याची मध्यमपुरुषाची दोन वचने तेवढीं राहिली. त्रिवचन उप्तन्न झाल्यावर अनुकरणाने प्रथमपुरुषाचे अनेकवचनही वेदपूर्वकाली बनले गेले. परंतु तत्पूर्वीच हा अह्ह्न आह् धातू भाषेतून लुप्त होऊन गेला होता व त्याची जागा ब्रू या धातूने व्यापिल्यामुळे प्रथम पुरुषाच्या अनेकवचनाप्रमाणे उत्तमपुरुषाची तिन्ही वचने व मध्यमपुरुषाचे अनेकवचन नवीन निर्माण करण्याच्या भरीत समाज सहजच पडला नाही.