Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
५३ प्राथमिक पूर्ववैदिकभाषेत वैय्याकरिणलिंगभेद ज्याप्रमाणे बिलकूल नव्हता, त्याप्रमाणेच वचनभेदही मुळात बिलकूल नव्हता. आस्ते आस्ते वचनभेद प्रादुर्भूत होऊ लागला, असे म्हणता येण्यास काही गमके संकृतभाषेत शिल्लक राहिलेली आहेत. वच् हा धातू संस्कृतात अत्यंत जुनाट आहे. या धातुसंबंधाने वैय्याकरणात अशी त्रिविध परंपरागतकथा प्रचलित होती की या धातूला १) फक्त वर्तमानकालाच्या प्रथमपुरुषाचे अनेक वचन नाही, २) कोणत्याच पुरुषाचे अनेक वचन नाही व ३) प्रथमपुरुषाचे अनेक वचन नाही. या त्रिविध कथेचा मतलब असा की वच् या धातूला अनेक वचन एकेकाळी नव्हते. का नव्हते? वच् या धातूत असा कोणता दोष होता की अनेक वचनी तो योजिला जाऊ नये? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की वच् हा धातू ज्या पूर्ववैदिक प्राथमिक भाषेत प्रथम उत्पन्न झाला त्या पूर्ववैदिक प्राथमिक भाषेत बहुवचन उर्फ अनेकवचन ऊर्फ त्रिवचन त्याकाळी निर्माण झालेले नव्हते, ती भाषा बोलणाऱ्यात संख्या फक्त दोनपर्यंत माहीत होत्या व सर्वनामांची वचने फक्त दोनपर्यंत माहीत होती म्हणजे एकवचन व द्विवचन अशी फक्त दोनच वचने भाषेत उत्पन्न झाली होती. अर्थातच वच् या प्राथमिक भाषेतील अत्यंत प्राथमिक धातू पुढे एकवचनाची व द्विवचनाचीच तेवढीं सर्वनामे येत, अनेक वचनी सर्वनामरूपे मुदलातच नसल्यामुळे ती वच् धातू पुढे येत नसत. कालांतराने प्राथमिक पूर्ववैदिक भाषेची द्वैवचनिक अवस्था संपली आणि त्या भाषेत किंवा त्या भाषेच्या कन्याभाषेत त्रिवचन निर्माण झाले. तत्रापि वच् या धातूपुढे एक ह्न व द्वि ह्न अशी दोनच वचने लावण्याचा जो एकदा पिढ्यानपिढ्या प्रघात पडला तो त्या कन्याभाषेतही, त्रिवचन निर्माण झाले असता सुद्धा, तसाच कायम राहून, त्या प्रघाताचा पेंड भट्टोजी दीक्षितांच्यापर्यंत येऊन पोहोचला. तात्पर्य, वच् हा धातू प्राथमिक भाषेत जेव्हा प्रचलित झाला तेव्हा त्या भाषेत दोनच वचने निर्माण झाली होती. वच् धातू जी पुरातन कहाणी सांगतो त्या कहाणीला संस्कृतातील दुसऱ्या एक पुरातन धातूची साक्ष देता येते. तो धातू सर्वाच्या परिचयाचा जो आह् किंवा अह् धातू तो होय. या धातूची मध्यमपुरुषाची आत्थ व आहथु: ही दोनच रूपे संस्कृत भाषेत आहेत म्हणून पाणिनी सांगतो. आह् धातूचे किंवा अह् धातूचे मध्यमपुरुषाचे अनेक वचन नाही. याचा अर्थ असा की, आह् किंवा अह् धातू जेव्हा प्राथमिक भाषेत उत्पन्न झाला तेव्हा त्याभाषेत फक्त एक ह्न व द्वि ह्न अशी दोनच वचने निर्माण झाली होती, त्रिवचन निर्माण झाले नव्हते, अशा द्वैवचनिक काली अह् धातू लिटांत असा चाले :