Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
एक द्वि
उत्तम आह (आहह=आहअ=आह) आहव (आहो)
मध्यम आत्थ आहथु:
प्रथम आह आहतु:
पुढे प्राथमिक भाषोत्पन्न कन्याभाषेत ऊर्फ अपत्यभाषेत त्रिवचन निर्माण झाल्यावर प्रथमपुरुषाचे त्रिवचन आहु: हे अस्तित्वात आले. परंतु मुळात प्रथमपुरुषी हि एक ह्न व द्वि ह्न अशी दोन च वचनांची रूपे मध्यमपुरुषातल्याप्रमाणेच होती. हा आह् धातू अत्यंत प्राथमिक ह्न रानटी प्राथमिक मनुष्याने प्रथम तोंड जेव्हा उघडले तेव्हा आह्, आ: असा उच्चार त्याच्या मुखांतून निघाला. तोच हा आह् धातू. तोंड उघडून व श्वास टाकून निघणारा जो हा आह्, आ: उच्चार त्या उच्चाराला प्राथमिक मनुष्याने ज्ञानत: बोलणे हा अर्थ लावला. हा आह्, आ: धातू आश्चर्य, आ:चर्य आह्चर्य या संस्कृत शब्दात आढळतो. तसाच तो अहह! या उद्गारात अह् रूपाने आढळतो. मुळात अहह् हे रूप आहह् असे होते व ते अह् धातूचे लिटाच्या उत्तमपुरुषाच्या एकवचनाचे आहे. अहह् किंवा आहह् असे म्हणजे मी बोलतो. लिटाच्या उत्तम पुरुषाच्या द्विवचनी अह् किंवा आह् धातूचे रूप आहव असे असे. त्याचा अपभ्रंश होऊन आहो! हा उद्गार बनला. आहो म्हणजे आम्ही दोघे म्हणतो, आम्ही दोघे बोलतो, असा मुळात होता. मुळात आहह् व आहव ही क्रियापदरूपे होती, त्यांचा उपयोग प्राथमिक भाषा बोलणारे आर्य वारंवार जेथे तेथे करीत. रानटी लोकात अहंकाराचे बोलणे फार असते ह्न मी म्हणतो, हा घोडा आहे, आहह् अयं अश्व: अस्ति; आम्ही म्हणतो हा साप आहे, आवां आहव, अयं सर्प: अस्ति: असे अहंकारयुक्त प्रयोग रानटी प्राथमिक आर्य अतिशय करीत. त्यामुळे आहह् व आहव या क्रियापद रूपांना उपपदांचे ऊर्फ उद्गारांचे रूप येऊन व पुढे अपभ्रंश होऊन, अहह! व आहो! हे केवळ उद्गारवाचक शब्द बनले. उत्तमपुरुषाची ही दोन रूपे उद्गार बनल्यामुळे व त्यांचे अपभ्रंश झाल्यामुळे अह् किंवा आह् धातूची उत्तमपुरुषाची रूपे कोणती हे पुढे हजारो वर्षांनी झालेल्या वैय्याकरणांना उमगेना, सबब त्यांनी नोंद करून ठेवली की अह् ह्न आह् धातूला उत्तमपुरुषाची रूपे नाहीत. क्रियापदरूपे उद्गारवाचक बनल्याची उदाहरणे वैदिक व संस्कृत भाषेत काही आहेत. अस्ति, अस्तु, भवतु, स्वस्ति ही क्रियापदरूपे संस्कृत भाषेत उद्गारवाचक अव्यये बनलेली सुप्रसिद्ध आहेत. अस्ति, अस्तु इत्यादी अव्ययात व अहह! आहो! इत्यादी अव्ययात भेद एवढाच की अस्ति ह्न अस्तु ही अव्यये असून, शिवाय क्रियापदरूपे म्हणून प्रचलित आहेत. लुप्त झालेली नाहीत; परंतु अहह् व आहो ही क्रियापदरूपे या नात्याने लोप पावलेली आहेत. भेदाचे कारण एवढेच की, अहह व आहो हे अपभ्रंश ज्या आहह व आहव रूपांचे ती रूपे ज्या प्राथमिक भाषेत प्रचलित होती ती पूर्व भाषा समाप्त झाल्यामुळे, समाप्त होण्याच्या पूर्वींच त्या रूपांना उद्गाररूपत्व येऊन चुकल्यामुळे व अपभ्रंशत्वही मिळाल्यामुळे त्यांच्या क्रियापदरूपत्वाचा लोप झाला. वैदिक व संस्कृत या उत्तर व अलीकडील भाषात अस्ति, अस्तु ही रूपे यद्यपि अन्यये बनली, तत्रापि त्यांचे अपभ्रंश झाले नाहीत व त्या भाषा मृतही झाल्या नाहीत. सबब या अस्ति ह्न अस्तु शब्दांचे क्रियापदरूपत्व व अव्ययत्व अशी दोन्ही प्रचारात राहिली.