Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
५७ र, रिर् व इर् हा प्रत्यय शेरते, दुह्ते, अदुह्न्, श्रृण्विरे, ससृज्रिरे, अववृत्रन्त, भवेरन् इत्यादी शेकडो वैदिक क्रियापदरूपात व संस्कृत क्रियापदरूपात आढळतो. हा र् रि र् व इर् प्रत्यय त्रि: ऊर्फ त्रिर् व तृ या संख्यावाचक शब्दांचा अपभ्रंश आहे. त्रिर् = रि र तृ = र्. अन् सर्वनामाचा अर्थ दुसरे, इतर, अन्य असा सामान्य बहुत्वदर्शक आहे. त्रिर्, तु या संख्यावाचक सर्वनामाचा अर्थ फक्त तीन असा आहे. एक वस्तूचा बोध एकवचनाने होई व दोन वस्तूंचा बोध द्विवचनाने होई. या द्विवचनाच्या पुढील पायरी म्हटली म्हणजे तीन वस्तूंचा बोध करणाऱ्या त्रिवचनाची. हे तिसरे वचन कित्येक आर्यसमाज स् या शब्दाचा उपयोग तीनदा करून किंवा अन्यार्थक अन् सर्वनाम योजून दर्शवीत असत; परंतु तीन या संख्येचा वाचक त्रिर् व तृ हे शब्द भाषेत निर्माण झाल्यावर, कित्येक आर्यंसमाज त् किंवा तदर्थक इतर सर्वनामे यांच्या पूर्वीं त्रिर् किंवा तृ हा संख्यावाचक शब्द घालून त्रिवचन प्रदर्शित करू लागले. उदाहरणार्थ शी धातू घेऊ. याचे प्रथमपुरुषाचे अनेकवचन तृ चा अपभ्रंश जो र प्रत्यय तो अते या सर्वनामाच्या पाठीमागे घालून शे+र्+ अते= शेरते असे करीत. रते म्हणजे तीन ते, तिघे ते. शेरते म्हणजे तिघे ते किंवा ते तीन निजतात. त्च्या पाठीमागे अन् सर्वनाम योजून शयन्ते असेही रूप वैदिक आर्य बनवीत आणि र् उपसर्ग त्च्या पाठीमागे लावून शेरते असेही रूप वैदिक आर्य बनवीत आणि र् उपसर्ग त्च्या पाठीमागे लावून शेरते असेही रूप बनवीत. या र्च्या पुढे त् सर्वनाम जसे घालीत तशीच ए, अम् व अन् हीही तदर्थक किंवा तत्सनामार्थक सर्वनामे घालीत. दुह्ते या रूपातर च्या पुढे अते सर्वनाम आले आहे. दुहे् या रूपात र्च्या पुढे ए हे सर्वनाम आले आहे. ए म्हणजे हे रे म्हणजे हे तिघे. दुहे् म्हणजे हे तिघे दूध काढतात. दुह्ताम् या रूपात र् च्या पुढे अताम् हे जोड सर्वनाम आले आहे. परंतु दुहाम् या रूपात र् च्या पुढे आम् किंवा अअम् सर्वनाम आले आहे. अम् म्हणजे हे. राम् म्हणजे हे तिघे. दुहाम म्हणजे हे तिघे दूध काढोत (लोट्). दुह्ताम् म्हणजे (त्) ते (आम्) हे ते (र) तिघे दूध काढोत. अम् व अन् या सर्वनामांच्या पाठीमागे र् हा तीन संख्यावाचक शब्द खालीत वैदिक रूपात आढळतो. अन्: ह्न अकृपन्, अदृश्रन अबुध्रन, असग्रन्, अम्: ह्न अद्दश्राम्, अबुध्रम , असृग्रम् अदृन् इ. इ. म्हणजे तीन अन्य पाहते झाले. अदृश्रम् म्हणजे तिघे हे पहाते झाले. तात्पर्य, धातूंपुढे तीन या अर्थाचा र् शब्द घालून त्या र् पुढे त्, ए, अन् व अम् अशी सर्वनामे योजीत. त्रिर् चा अपभ्रंश रि र् हा शब्द किंवा प्रत्यय ससृज्रिरे, दद्रिरे, विविद्रिरे, जगभ्रिरे इत्यादी लिट्च्या आत्मनायक प्रथमपुरुषाच्या अनेकवचनी रूपात आढळतो. दद् + रिर्+ए= दद्रिरे, रिर् म्हणजे तीन किंवा तिघे ए म्हणजे हा दद्रिरे म्हणजे हे तिघे देतात. दद्रिरे हे दुहेरी अनेकवचन आहे, ही कित्येकांची भ्रान्त कल्पना आहे. दद्रिरे हे एकेरीच अनेकवचन आहे. त्रिर् चा इर् असाही एक अपभ्रंश होता व तो श्रृण्विरे, इन्दिरे, सुन्विरे इत्यादी रूपात आढळतो. श्रृणु + इर् + ए =श्रृण्विरे. इर् म्हणजे तीन किंवा तिघे आणि ए म्हणजे हे, श्रृण्विरे म्हणजे हे तिघे ऐकतात. वरती दुऱ्हाम् हे लोट् चे रूप पृथक्कारले आहे, त्याच्याच जोडीचे ददृश्राम् हे रूप आहे. हे रूप लिट्च्या लोट्च्या प्रथमपुरुषाच्या अनेकवचनाचे आहे. ददृश् + र् + आम् = ददृश्राम्. ददृश्राम् म्हणजे हे (आम्) तिघे (र्) पाहतात (ददृश्). राम् प्रत्यय मुळात काय आहे हे न समजल्यामुळे, म्याक्डोनेल या प्रत्ययाला uniuqe म्हणतो ! (Macdonell Vedic Grammar page 362). तू सर्वनामाप्रमाणेच ए, अन् व अम् किंवा आम् सर्वनामे र् या संख्याप्रत्ययापुढे योजीत हे याबाबींतील गुह्य आहे.