Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

(क) लोट् प्रथमपुरुष द्विवचन ह्न धातू + तास् (ऱ्ह्)
प्राथमिक भाषेत तस् प्रमाणे त या सर्वनामाचे तास् असेही द्विवचन होत असे.
गम् + ताऱ्ह् = गंतार्. यज् + ताऱ्ह् = यष्टार्. दा + ताऱ्ह् = दातार् (लट्) भव तस्, (लिङ् किंवा लोट् अ ह्न भव ह्न ताम्), यात त व ता हे उच्चार जसे येतात तसे च तर् व तार् हे उच्चार येत असत.

(ख) लिट् प्रथमपुरुष अनेकवचन ह्न धातू + उस् किंवा उर्
तप् + उस् = तपुस्. जन् + उस् = जनुस्) वन् + उस् = वनुस्. यज् + उस् = यजुस्. यज् + उस् या वाक्याचा अर्थ ते पूजा करतात असा होतो.

(ग) लट् मध्यमपुरुष एकवचन परस्मै ह्न धातू + सि अथवा असि
घा + सि = घासि. अत + असि = अतसि.

(घ) धातू + उ
प्राथमिक भाषेच्या अत्यंत जुनाट थरांत प्रथमपुरुषाच्या एकवचनाचे उ हे सर्वनाम होते.
हन् + उ = हनु. बाह् + उ = बाहु. तन् + उ = तनु हन् उ या वाक्याचा अर्थ तो किंवा हा हणतो. बाह् उ म्हणजे तो किंवा हा खुणावतो. तन् उ म्हणजे तो किंवा हा पसरतो. प्राथमिक भाषेत मी, तू, तो या पुरुषवाचक सर्वनामांप्रमाणे धातूच्या पुढे हा या अर्थाचे सर्वनामही येई.

(ड) धातू + क किंवा अक, इक
शुष् + क= शुष्क. पुष् + क = पुष्क (ल) यस् + क = यस्क. शुष् क या वाक्याचा अर्थ, कोणी शोषतो. पुष् क म्हणजे कोणी पोषतो. धातूपुढे क हे सर्वनाम आले आहे.