Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

(अ) केवळ मूळ धातू ह्न दा (देणारा), दृश् (पाहणारा ह्न नेत्र), भिद्, इ.इ.इ.
प्रत्यय लागत नसत अशा स्थितीत प्राथमिक भाषा असताना जी धातूंची मूळरूपे असत तीच नामे म्हणून सप्रत्यय स्थितीत मानू लागले. अप्रत्यय स्थितीत नामे व धातू असे शब्दांचे भेद झाले नव्हते.

(आ) लोट् मध्यमपुरुष एकवचन ह्न धातू + अ
प्रौ + अ = प्रिय, चर् +अ = चर, श्रम् + अ = श्रम. धातूंत काही एक विकार
न होता, त्यापुढे त्वमर्थक अ हा शब्द येत असे. नी ह्न नय् + अ = नय; हू ह्न हव् + अ = हव; हीं रूपे अविकारी भाषेतील नसून पुढील सविकारी भाषेतील आहेत, हे ध्यानात ठेवणे जरूर आहे. प्रौ + अ म्हणजे तू संतुष्ट हो; चर् + अ म्हणजे तू चल; असे मूळ वाक्यांचे अर्थ होते.

(इ) लेट् उत्तम पुरुष एकवचन ह्न धातू + आ
निंद् + आ = निंदा. शंक् + आ = शंका, स्पृह् + आ = स्पृहा, निंद आ या वाक्याचा अविकारी भाषेत मी निंदू असा अर्थ होता.
(ई) लट् उत्तमपुरुष एकवचन ह्न धातू + अन चर् + अन = चरण. स्फुर् + अन = स्फुरण. तप् + अन = तपन, अहन म्हणजे मी. अहन् चा अपभ्रंश अन. त्वर् + अहन् = चर् + अन = चरण. या वाक्याचा अर्थ अविकारी भाषेत मी चलतो असा होता.
(उ) केवळ मूळ धातू अधिक इच्छार्थक किंवा भृशार्थक अस् किंवा स् (सन्नन्ताचे मूळ)
तप् + अस् = तपस्. नभ् + अस् = नभस्, उष् + अस् = उषस्. तप् अधिक अस् म्हणजे अतिशय तापणे. उष् + अस् म्हणजे दाह की उजेड होऊ पहाणे. प्रातस् ह्न प्रातर्, अंतस् ह्न अंतर् इत्यादी सकारान्त किंवा रकारान्त शब्द या वर्गातील आहेत. स् चा उच्चार प्राथमिक भाषेत ऱ्ह होत असे, त्यामुळे या शब्दांचा अंत स् किंवा र् विकल्पाने होतो.
(ऊ) लट् उत्तमपुरुष एकवचन ह्न धातू + नि अथवा अनि (अन प्रमाणें)
वह् + नि = वहिन, अश् + नि = अश्नि, वृष् + नि = वृष्णि, चर् + अनिं =
चरणि, अश् + अनि = अशनि, क्षिप् + अनि = क्षिपणि.
(ऋ) लट् आत्मने प्रथमपुरुष एकवचन ह्न धातू + इ
रुच् + इ = रुचि, कृष् + इ = कृषि, शुच् + इ = शुचि.
(ऋ) लट् परस्मै प्रथमपुरुष एकवचन ह्न धातू + ति
तृप + ति = तृप्ति, भू + ति = भूति, वृध् + ति = वृद्धि.
(लृ) लङ् परस्मै मध्यमपुरुष अनेकवचन ह्न धातू + त
घृ + त + घृत, स् + त = सृत, ऋ + त=ऋत, नृत् + त = नृत्त.
वृ त या वाक्याचा अर्थ. तुम्ही सेचन करता, असा मूळात होता. नृत् + त या वाक्याचा अर्थ तुम्ही वाचता, असा होता.