Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
त्यामुळे या शब्दांचा प्राथमिक मनुष्य वेळ पडेल त्याप्रमाणे धातूसारखाही उपयोग करी व नामासारखाही उपयोग करी. सु किंवा सु हा शब्द ती प्रसवते या अर्थाचे विधान करावयाचे असता सू ते या वाक्यात प्राथमिक मनुष्य स्वतंत्र योजी. सु ते = प्रसवते ती या वाक्यात सू हा शब्द ज्ञानत: क्रियापद म्हणूनही योजिलेला नाही किंवा नाम म्हणूनही योजिलेला नाही, केवळ शब्द म्हणून जसाच्या तसा योजिलेला आहे. हा सू शब्द विणारी, पोरे उत्पन्न करणारी या अर्थी सू म्हणूनही प्राथमिक मनुष्य योजी, दृश् ति या वाक्यातील दृश् शब्द व दृश् म्हणजे डोळा या अर्थाचा दृश् शब्द एकच. दृश् ति हे वाक्य एकदम उच्चारले म्हणजे दृष्टी असा उच्चार होई. दृष्टी या वाक्यालाच पुढे कालांतराने डोळा या अर्थाने नाम किंवा पदार्थ समजू लागले. परंतु मूळात दृष्टी हे वाक्य आहे व त्याचा अर्थ ती तो ते पहाते असा आहे. तात्पर्य, नीति, कृति, भूति, गति, रति, मति, गीति, घीति ही सर्वनामे मूलत: वाक्ये होती. ही बाब लक्षात न आल्याकारणाने पाणिनीने क्तिन् हा कृत्प्रत्यय सांगितला आहे. दृश्, भू, सू, नी या नामांना पाणिनी क्किप् प्रत्यय सांगतो आणि गाफीलपणाने अध्वगत्, सोमसुत्, टीकाकृत् इत्यादी सामासिक शब्दांतील गत्, सुत्, कृत् वगैरे शब्दही क्किप्ने बनले आहेत असे विधान करतो. बोलण्याच्या अतिघसरटीने गति, सुति, कृति इत्यादी वाक्यातील अन्त्य इ चा लोप होऊन गत्, सुत्, कृत्, भृत्, नत्, तत् इत्यादी शब्द बनले आहेत हे आपणास दिसत आहे. त्याअर्थीं यांना व्किप् लावण्यापेक्षा क्तिन् प्रत्यय लावणे शास्त्रोक्त दिसते. त्याचप्रमाणे आत्मनेपदी कृषि, जनि, ऋषि, असि, पणि, पति, पठि, गिलि, गिरि, चूर्णि इत्यादी अनेक प्राथमिक भाषेतील रूपे कालांतराने नामे समजली गेली आहेत. कृष्, जन्, गृ इत्यादी धातूंना इक् प्रत्यय लागून कृषि, जनि, गिरि: इत्यादी नामे झाली आहेत, असे पाणिनी समजतो. तात्पर्य, इ. ति, त् इत्यादी अनेक कृत्प्रत्ययान्त शब्द मूळत: प्राथमिक भाषेतील क्रियापदे अथवा वाक्ये आहेत. साध्या धातूंची अविकृत रूपे म्हटली म्हणजे हेच शब्द होते. प्राथमिक भाषेतील वाक्यापासून वैदिक कुदन्ते जी बनली त्यांची क्रमवार यादीच देतो, म्हणजे हा मुद्दा बळकट होईल.