Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
लोटांत जन् चे प्रथमपुरुषैकवचन जंतु असे. जन् चे आत्मनेपदीं प्रथमपुरुषैकवचन जनि गंति, कृति, भूति, जंतु, जनि इत्यादी रूपे येथे जोडून दाखविली आहेत. परंतु जुनाट प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत ही रूपे जोडलेली समजत नसत. कारण, अद्याप मि, सि , ति वगैरे सर्वनामे प्रत्ययांच्या पदवीस पोहोचलेली नव्हती. धातू प्रथम उच्चारीत आणि मि, सि, ति वगैरे त्याचे कर्ते नंतर उच्चारीत. गम् ति, भू ति, जं तु, जन् इ अपृक्त उच्चार प्राथमिक अप्रत्यय भाषेत होत असे. पुढेही प्राथमिक अप्रत्यय भाषा लोप पावली आणि हिच्यातील भूति, जंतु, जनि, कृति, भूमि वगैरे रूपे तदनंतरच्या भाषेत नामे म्हणून समजली जाऊ लागली. नामे आधीची की धातू आधीचे, नामांपासून क्रियापदे झाली, की क्रियापदापासून नामे झाली, अशा एक वाद आहे, त्याचे उत्तर देण्यास हे स्थान योग्य आहे. असे दिसते की क्रियावाचक शब्द व अहम् अ हन् ही सर्वनामे प्राथमिक मनुष्याच्या मुखांतून जरूरीकरता प्रथम बाहेर पडली. या सर्वनाम शब्दांचा व धातुशब्दांचा तो योग करू लागला. सर्वनामांचा व धातूंचा योग अतिपरिचयाने इतका बेमालूम झाला की प्राथमिक भाषा मेल्यावर त्या योगाला च स्वतंत्र नामाची स्थिती प्राथमिकभाषोत्पन्न दुसऱ्या भाषेत आली. तात्पर्य, नामे व धातू या संज्ञा ज्या शब्दांना पुढे वैय्याकरण देऊ लागले ते दोन्ही प्रकारचे शब्द प्राथमिक भाषेत एकाच वेळी उत्पन्न झाले. धातू अगोदर झाले किंवा नामे अगोदर झाली असे कोणतेही एक विधान प्रामाणिक नाही. नंतर दोन चार भाषा झाल्यावर व मेल्यावर धातूंपासून नामे होऊ लागली व नामांपासून धातू होऊ लागले. नुसत्या धातूंचा उपयोग नामासारखा झालेला व नुसत्या नामांचा उपयोग धातुंसारखा होत असलेला संस्कृत भाषेत अनुभवास येतो. दृश् हा धातू नाम होऊ शकतो व कृष्ण हे नाम धातू होऊ शकते. तात्पर्य, प्राथमिक नामे व धातू एकदमच भाषेत झालेली आहेत. नंतर धातूंपासून नामे बनत व नामांपासून धातू बनत. असा हा अन्योन्य जननाचा प्रकार आहे. हा प्रकार संस्कृत वैय्याकरणांना ओळखता आलेला नाही. मूळ धातू म्हणून ज्यांना म्हणतात ते क्रियावाचक किंवा गुणवाचक शब्द असत. या शब्दांना त्या प्राथमिककाळीं धातू किंवा नामें म्हणून विभक्तपणें गणण्याला प्राथमिक मनुष्य शिकला नव्हता.