Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

९०. माहाराष्ट्रिक, राष्ट्रिक व वैराष्ट्रिक लोक उत्तरेकडील देशांतून आले या बाबीला दुसरा प्रत्यंतर पुरावा माहाराष्ट्रिकादी लोकांच्या पुरोहितांच्या शाखा व गोत्रे ऊर्फ आडनावे यांच्या मध्ये सापडतो. माहाराष्ट्रिकादि लोक वैदिकधर्मी पडल्यामुळे, यज्ञयार्गार्थ त्यांनी आपले पुरोहितही आपल्याबरोबर वसाहतीत आणिले. सध्या महाराष्ट्रात नागपूर, व-हाड, खानदेश, नाशिक, औरंगाबाद, बीड, सातारा वगैरे प्रांतात यजुर्वेदी ब्राह्मणांची संख्या बहुतम आहे, त्यांच्या खालोखाल ऋग्वेद्यांचा भरणा आहे आणि त्याच्या खाली काण्व, मैत्रायणीय इत्यादी शाखांची वसती आहे. सामवेदी व अथर्ववेदी ब्राह्मण महाराष्ट्रात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके असतील नसतील. माहाराष्ट्रिकादी लोक मगध, कुरु, पांचाल, मत्स्य, उत्तरकुरू व उत्तरभद्र या देशातून आले, तेव्हा त्यांचे पुरोहितही त्याच देशांतून आले असले पाहिजेत हे सांगणे न लगे. करता नर्मदोत्तर प्रदेशात सध्या कोणत्या शाखांच्या ब्राह्मणांचा भरणा कोणत्या देशात विशेष आहे ते पाहू. त्या त्या प्रांतात त्या त्या शाखा पुरातनकालापासून अभिजन आहेत असे धरून ही पहाणी करावयाची आहे. काश्मीर हा अर्वाचीन देश म्हणजे ऐतरेयब्राह्मणकालीन उत्तरकुरु व उत्तरमद ह्या देशांचा दक्षिण भाग आहे. ह्या देशातील ब्राह्मण कृष्णयजुर्वेदी, कठशाखी व लौगाक्षिसूत्री आहेत. ह्यांच्यात जी आडनावे सध्या प्रचलित आहेत त्यापैकी काही तत्सदृश मराठी आडनावांसह देतो :

काश्मिरी मराठी काश्मिरी मराठी
१) भैरव बेहरे  २) भूत भुते  ३) त्रकारी टकारे  ४) वैष्णव वैष्णव ५) भट भट  ६) राख्यस राक्षे  ७) काली काळे  ८) बंगी बंगी ९) छात्री छत्रे १०) वास व्यास ११) वारिकी वारके १२) डुली डुले १३) पांडे पांडे १४) विचारी विचारे १५) चंद्र चंद्रे