Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रयाणीं रवी धूलिधारीं दिसे ना । पडे गांव दीढे कसी रुंद सेना ॥
सदा वैरियांची शिरें जो समेटी । सदा भांडवी मत्तमातंग जेठी ॥
सदा फारधी फौज बांधोन खेले । सदा नीववी कामिनीचित्तडोले ॥९१॥
सदा ब्रह्मचर्चा करी पंडितांसीं । सदा दे समस्या कवीकोविदांसी ॥
सदा आइके भाटपार्हाटगाणीं। सदा शुद्धदेशीय वैकारगाणी ॥९२॥
कधी बोलवी सारिका रक्तरांवें । कधिं नृत्यशालांतरी सौख्य पावे ॥
कधीं याग आरंभवी विप्रहस्तीं । कधीं शेविजे कार्यभारीं समस्तीं ॥९३॥
कधीं मानभावास भेटीस आणी । तयांचे शिरीं वंदि तो पायपाणीं ॥
अशक्तें अनाथें जनीं अंधपंगें । तयां लागि दे अन्नवस्त्रें प्रसंगें ॥९४॥
सदा सर्वदा जे सदा धर्म जे जे । करूनि दिल्हे एकएकांस जे जे ।
सदा पूजवी सर्व ही ज्योतिलिंगें । त्रिकालीं पुजा विप्र गाती षडंगें ॥९५॥
जसी चंपकेंशी खुले फुल्लजाई । भली शोभली ज्यास जाया जिजाई ॥
जिचेर् कीर्त्तिचा चबु जंबुद्विपाला । करी साउली माउलीसी मुलाला ॥९६॥
अहो सर्वसाम्राज्यलक्ष्मी जयाची । तसी दूसरी श्री महाराजयाची ॥
जिणें निर्मिलीसे असी एक पोहे । जिच्या नित्यदानोदकीं विश्व पोहे ॥९७॥
टिकेचा धणी लेंक ज्याचा शिवाजी । करी तो चहुं पातशाहाशि वाजी ॥
तयाला रणा माजि हें एक माने । अरी जैं गला घालुनी ये कमाने ॥९८॥
तया धाकटा कृष्ण जैसा बलाचा । उपेंद्रा परी बंधु आखंडलाचा ॥
शशी नित्यसंपूर्ण सोलां कलांचा । तसा एकराजा महीमंडलाचा ॥९९॥
असा हा शहाराज विश्वेश आहे । गणाधीश हा एकभूपाल पाहे ॥
प्रभापाणि नारायण श्रीतुकाई । असी पूजिल्या ये भवा हेतु काई ॥१००॥
देव बोलति जगीं जनमावें । शाहराज मग तूज नमावें ॥
हे तुझी स्थिति न ये जनकासी । तूं चि ये कलयुगीं जन-कासी ॥१०१॥
महादेवदेवीं च शेवा जयाची । सदा होतसे लब्धि याला जयाची ॥
सख्या ते पदद्वंद त्याचे नमा गे । म्हणे कामिनी आणिखी मी न मागें ॥
त्वरेनें तयांच्या वऱ्या शाहरा जा । मनांतून आणा घरा शाहराजा ॥१०२॥