Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१५७]                                        ।। श्री ।।                    २९ जानुआरी १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासी:

पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं दोन पत्रें एक पौष वद्य ३० दुसरें पौष शुद्ध ७ कुंजपुरचें मुक्कामचें पाठविले तें माघ शुद्ध १० प्रविष्ट जाहालें. अबदाली तीस पसतीस हजार फोजेनिशीं चालोन आला. याजकरितां नजीबखानाचा मुकदीमा२२८ तैंच ठेऊन सरदार व वजीर अबदालीवर चालोन गेले. समागमें आह्मांसहि आणिलें. पौष शुद्ध ५ पंचमीस गांठ पडली. युद्ध जालें. वजीर व राजेश्री जनकोजी शिंदे बुनगेसहित मागें राहिले. राजश्री दत्ताजी शिंदे सडे होऊन गांठ घातली. त्यास अबदालीची फौज भारी; तथापि दत्ताजीबावांनी बरें वजन२२९ नरम केलें. त्यांनीं डांगर धरून अंतरवेदींतून दिल्लीस यावें, नजीबखानास सामील करून घ्यावें, असा त्याणीं विचार केला. नजीबखानहि त्यास येऊन सामील जाला. सरदार त्यास घेरून आहेत. तथापि ती भारी. स्वामींनीं राजश्रीं मल्हारजीबावा, पत्रें पाठवून ते, लौकर येत तें करावें व दहा हजार फौज एक सरदार साळसुद मुलूख कौलीं न लुटी ऐसा ग्वालेरेसमीप पाठवावा. जमीदारांनीं हराम जीदंगी केली. ऐन हंगामींच बखेडा जाला ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळलें. ऐशास अबदाली आला. याजकरितां राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे रोहिल्यांचा कारभार ठेऊन गेले. तेच समयीं राजश्री मल्हारजी होळकर यांसहि सामील करून जावयाचें होतें. तें न केलें. मल्हारबांनीं आधीं काम कोणतें करावें ? मग कोणतें करावें ? माधोसिंगाचा मजकूर काय ? जेव्हां ह्मटलें तेव्हां पारपत्य होतें. तो विचार त्यांनीं न केला. दत्तबा तो इश्वराचे घरचे शिपाई ! त्यास अबदालीची तमा काय ? जाऊन गांठ घातली. ते स्यास सोडतील ऐसें नाहीं. मल्हारबास वारंवार जावयाविशीं पत्रें पाठविलीं. बहुतकरून मल्हारबा जाऊन सामील जालेच असतील. प्रस्तुतहि त्यास पत्र पाठविलें आहे व दत्तबासहि पत्र पाठविलें असे. तें त्यास देणें. अबदालीचें पारपत्य करावयाविशीं मनःपूर्वक तुह्मी सर्व मेहनत करीत असालच. करावी. दहा हजार फौज पाठवावयाविशीं लिहिलें. तरी इकडे निजामअल्लीखानांनीं बिघाड केला. त्याजवरी चिरंजीव राजश्री भाऊ व दादा व राव गेले. उदगिरीसमीप गांठ पडली. एक दोन जुंझें चांगलीं जालीं. त्याच्या गटांत गोळे चालविले. एक दोन हत्तीनिशीं ठार व एक हत्ती ठार जाला. मोगल नरम जालाच आहे. हा गुंता सत्वरच वारतो. चिरंजीव राजश्री दादासच अविलंबें रवाना करून. तुह्मीं तिकडील वर्तमान वरच्यावर लिहीत जाणें. च्यार दिवस अधिक आगळे दादासाहेबास लागले तर फौज दाहा हजार त्वरेनेंच पाठवितों. तुह्मीं आपले कमाविसदारांस वरकडास लेहून खबरदारीनें राहात, जमीदार लबाडीवर येऊं न पावत तें करणें, शामलाचें असाध्य स्थल२३० उंदेरी, समुद्रांतील जागा, अरमार व लोकांनीं मेहनत करून चद्रं २९ जमादिलावली फत्ते करून जंजिरा काशावर गेले. तिकडील धर सुटला आहे. +तेंहि कार्य व्हावेंसें आहे. चंद्र १० जमादिलाखर. हे विनंति.