Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१५८] ।। श्री ।। २९ जानुआरी १७६०.
पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासिः
नमस्कार विनंति उपरि. अबदाली जवळ आला. दत्तबा सडे होऊन गेले. यंदा अब्दाली भारी आहे. बहुत तिकडे मिळाले आहेत. सत्वर फौज दहा हजार रवाना करावी. जमीदार सर्व फिसादीवर आहेत. ह्यणून विस्तारें लिहिलें तें अवगत जाहलें. तिकडे फौज पाठवणें जरूर आहे. परंतु निजामअल्लीसी जुंझ प्रारंभ जाहाल्यास पंधरा दिवस जाहले. मोंगल थोडा आहे. सरकारची फौज चाळीस हजार जमा जाहाली. इम्रामखान त्याकडील मातबर गाडद्याचा सरदार तिकडून फुटून२३१ आला. यंदा गाडदी बारा हजार आहे. तोफा मारितात. दर रोज त्यांचे हत्तीवरील सरदार पडतात. श्रीकृपनें सत्वरच मोगलाचें पारपत्य होईल. हें काम होतांच तिकडे फौज रवाना होईल. मल्हारबास वारंवार पत्रे रवाना केलीं आहेत. परंतु त्याचे प्रकृतीस तुह्मी जाणता. या दिवसांत दत्तबाकडील वर्तमान जरूर जलद कळलें पाहिजे. जलद वर्तमान तिकडील सर्व लिहीत जाणें. मनसूरअल्लीचे लेकाचे घरचें कच्चें वर्तमान लहान मोठें सर्व आणून लिहिणें. श्रीकृपेनें फाल्गुनअखेर येथील काम होईल. तदोत्तर बहुत फौज हिंदुस्थानांत रवाना होईल. उदेरी घेतली. कासाही घेतला. मग जंजिरा हातपाय मोडले. यंदा दाहीकडे कलह एकदांच प्राप्त आहे. श्रीकृपेनें उत्तमच होईल. काशीचा गुलाबसाखरकंदाची गैर जरूराती. उत्तम फर्मास जरूर रवाना करणें. सांप्रत आमचे शरीरप्रकृत उत्तम आहे. छ १० जमादिलाखर हे विनंति.