Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१५४] ।। श्री ।। १३ जानुआरी १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः-
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. वजिराकडील व अबदाली व सुजाअतदौला व रोहिले वगैरे त्या प्रांतींचें वर्तमान विस्तारें लिहिलें तें कळलें. ऐशास, प्रस्तुत अबदाली कोठें आहे ? राजश्री जनकोजी शिंदे व दत्ताजी शिंदे कोठें आहेत ? राजश्री मल्हारजी होळकर त्या प्रांतें गेले तेहि येऊन पावलेच असतील. कोणकोणाचा प्रकार कसा आहे तें विस्तारें वरच्यावर लिहीत जाणे. इकडील वर्तमान तरी निजामअल्लीखानांनी जागीर दहा लाखाची व नगर व परांडा दोन किल्ले सरकारांत द्यावयाचा करार केला असतां द्यावयास अनमान करूं लागले. यास्तव डेरेदाखल होऊन फौज जमा केली. नगरचा किल्ला घेतला. बाकी जागीर व येक किल्ला येणें. यास्तव दरमजल मोगलाच्या सुमारें उदगीरीनजीक आपली फौज मातबर जमा जाहाली. येका दो दिवशी गाठ पडेल. मोगलाची फौज ह्मणावी तरी बसालतजंग त्याचा भाऊ फुटोन करनाटकास२२३ गेला. मुसाबुसीहि अरकाटास२२४ गेला. इमराइमखान त्याजकडून निघोन सरकारांत येऊन चाकर जाहला. हणमंतराव निंबाळकर व जानोजी निंबाळकर व लक्षुमणराव खंडागळे आपआपल्या घरींच आहेत. तिगस्तां तुह्मीं मोगल पाहिला होता त्यापेक्षां यंदा थोडका आहे. येथील मुकदमा सत्वरच फैसला होईल. चिरंजीव राजश्री दादाचें येणें अविलंबेच त्या प्रांती होईल. तुह्मीं तिकडील वर्तमान वरच्यावर लिहीत जाणें. रवाना. छ २३ जमादिलावल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.