Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१५९] ।। श्री ।। ३० जानुआरी १७६०.
राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे गोसावी यांसि:
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने।। बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असलें पाहिजे. विशेष. तुमची व अबदालीची गांठ पडून युद्ध झालें ह्मणून परस्परें वर्तमान येतें. परंतु तुमचे पत्र येऊन साद्यंत वर्तमान कळत नाही. अबदालीपाशीं फौज किती आहे? त्याचा जोरा कसा आहे? तुह्मी कोणे जागा आहां ? व अबदाली कोठें ? त्याचा कस्त कसा आहे ? राजश्री मल्हारजी होळकर यांस वारंवार पत्रें पाठविलीं कीं तुह्मांस जाऊन सामील होणें. बहुधा ते तुह्मांजवळ पावलेच असतील. तरी सविस्तर वर्तमान लिहिणें. इकडील वर्तमान तर निजामअल्लीखानांनी बिघाड केला. त्याचे पारपत्यास चिरंजीव राजश्री भाऊ व दादा व राव गेले. एक दोन युद्धें झालीं. त्यास नरम करणें तें केलें. हा गुंता सत्वरच उरकतो. चिरंजीव राजश्री दादा अविलंबेंच त्या प्रांते येतील. तुह्मीं तिकडील वर्तमान वरचेवर लिहीत जाणें. अबदालीच्या पराजयाचें वर्तमान सत्वर लिहावें. +प्रथम तजविजीनें संभाळून काम करावें. जातीनशी जाया होऊं नये. सरदारीनें२३२ काम करावें. ईश्वर यश देईल. छ११ जमादिलाखर. बहुत काय लिहिणे. हे आशीर्वाद..