Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१५६] ।। श्री ।। २९ जानुआरी १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री गंगाधर यशवंत स्वामी गोसावी यांसिः
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे याची व अबदालीची गांठ पडून येक दोन युद्धें झालीं ह्मणोन वर्तमान आलें. राजश्री मल्हारबासाहि वर्तमान आलेंच असेल. मल्हारबास वारंवार जावयाविषयीं पत्रें पाठविलीं. बहुधा गेलेच असतील. तुह्मीं सर्वांनीं येकचित्तें करून मेहनत करून अबदालीचें पारपत्य करून अटकपार करावा हें सर्वात्कर्ष उत्तम आहे. + जरूर आधीं जावें. जयनगरचें२२७ जेव्हां ह्मटलें तैसें होईल. छ १० जमादिलाखर. हे विनंति.