Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१६०]                                        ।। श्री ।।                    ३० जानुआरी १७६०.

तीर्थस्वरूप राजश्री गोविंदपंत दादा वडिलांचे सेवेसी:

अपत्यें बाबूराव साष्टांग नमस्कार विनंति तागाईत माघ शुद्ध ||१३भौमवार, मु॥ अहमदनगर, वर्तमान यथास्थित असे. विशेष. वडिलीं पत्रे पाठविली तीं प्र॥ होऊन सविस्तर वर्तमान कळलें. अबदाली अंतरवेदींत आला, दंगा भारी आहे, ह्मणोन लिहिलें. त्यास, श्रीमंतांचीं पत्रें प्रविष्ट करून उत्तरें घेऊन पाठविलीं आहेत. राजश्री मल्हारजी होळकर येऊन सामील जाहलेच असतील. त्यांची पत्रें काल श्रीमंतांस आलीं कीं आपण जलदीनें निघोन शिंदेयांकडे गेलों ह्मणून त्यांनीं लिहिलें होतें. ते आले असतील. उभयतां येकत्र जालिया अबदालीचें पारपत्य करितील, यांत गुंता नाहीं. देशीहून फौज पाठविणें ह्मणोन आपण श्रीमतांस लिहिलें. त्यास, तूर्त मोगलाचे शहास गुंतले आहेत. उदगिरीचे अलीकडे साहा कोसांवर मोगल आहे. त्यास, श्रीमंत राजश्री भाऊसाहेब चौगीर्द फौजा बसवून उतरले आहेत. माघ शुद्ध२३३ प्रतिपदेस व द्वितीयेस ऐशीं दोन रोज दोन युद्धेंहि जालीं. इम्राहीमखान गारदी पहिला निजामअल्लीकडे होता तो तेथून सोडून येऊन सरकारांत चाकर राहिला आहे. त्यानें प्रथम तोंड लाविलें. व आणखी पतकेंहि दाहापांच कुमकेस होतीं. युद्धप्रसंग बराच जाहाला त्यास, मोंगलाकडील दोन तीन सरदार मातबर पडले. रेणकोदास ह्मणोन पांच हजार फौजेचा सरदार होता. तो कामास आला. व आणखी बरेंच माणूस दोन च्यार पडलें. गारदी दोनशें अडीचशें पावेतों मारिले. तीन हत्ती तोफानें गोळ्यानें वारले. सरकारचे गारदी पंचवीस पन्नास मेले व शेंपन्नास जखमी जाहले. शेंपन्नास घोडेहि जखमी जाहले. त्याजवरी खाविंदाचा रोख धारूरचा आहे. धारुरास आलाच असेल. सरकारच्या फौजा चौगीर्द चालतात. दाणावैरण त्यांस मिळों देत नाहीं. त्याचें लष्करांत दाणावैरणीचा आकांत आहे. दाणे पांच शेर जाले आहेत. लौकरीच गुंता उरकावा सारखा आहे. त्याचा मजकूर मराठे कोणी सामील जाहले नाहीं. त्यास, जाधवराव मात्र सामील जाहले आहेत. धारुरास येऊन व्यंकटराव निंबाळकर यांस सामील करावें, तदोत्तर जानोजी निंबाळकर यांसहि मेळवावें, ऐशा मजकुरांत आहे. परंतु धारुराअलीकडे येऊं देत नाहीं. तेथेंच गुंता उरकेल ऐसें दिसतें. त्याजपाशीं फौज बारा हजार आहे. गारदी दाहा हजार आहेत. तोफा शंभर आहेत. येणेंप्रमाणें सरंजाम आहे. सरकारी सामान भारी आहे. चाळीस हजार फौज आहे. महिना पंधरा रोजांत गुंता वारला तर फौजा तिकडे येतील. नाहीं तरी मग फौजा अखेर सालीं येत नाहींत. श्रीमंत राजश्री भाऊसाहेब व दादासाहेब यांचे पत्रांची उत्तरें आणवून पाठविली आहेत. +बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञापना.
पै ॥ चैत्र वद्य२३४ ३, मु।। ग्वालेर.