Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१५५] ।। श्री ।। २३ जानुआरी १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पौष वद्य २२५४ पाठविलें तें छ २६ जमदिलावलीं प्रविष्ट जाहलें. अबदालीची व सरदार व वजिराचे फौजेची संन्निधता जाली. अबदालीची फौज भारीच आहे. स्वामीचे प्रतापेकरून याचा पराजय होईल ह्मणोन विस्तारें लिहिलें. परस्पर वर्तमान आलें कीं अबदालीसी सरदारांसी मुकाबला होऊन लढाई२२६ बरें वजनें समशेरासमशेर जाहली आणि तुह्मीं काहींच लिहिलें नाहीं ! तरी सविस्तर वर्तमान जलद लिहीत जाणें. अबदालीचे फौजेचें बळाबळ कसें आहे ? फौज कशी आहे? सरदार परम धीर्येवान मर्द पराक्रमी आहेत. ते हिमतीस, बहादुरीस चुकतील असा अर्थ नाहीं. अबदालीस हतप्रभाव करावयाच्याच प्रयत्नांत, मनसुबियांत असतील. राजश्री मल्हारजी होळकर येऊन सामील जाहले न जाहले तें लिहणें. प्रस्तुत सरदार कोठे व अबदालीची फौज कोठें आहें? तो काय विचारावर आहे ? तें वर्तमान या दिवसांत जलद जलद आपल्याकडील देखील वर्तमान लिहीत जाणें. जाणिजे छ ४ जमादिलाखर सु॥ सितैन मय्या व अल्लफ. + बहुत काय लिहिणें, या दिवसांत जलद वर्तमान लिहीत जाणें. हे विनंति.