Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
बाजीराव १७४० त वारल्यावर बुंदेले हिस्सा देण्यास तक्रार करूं लागले. त्यावेळी गोविंदपंताची नेमणूक बुंदेलखंडाच्या कमविसीवर झाली. ह्यासंबंधानें बाजीरावाच्या मृत्यूचा सन १७३९ म्हणून भारतवर्षकार देतात तोहि चुकला आहे. काव्येतिहाससंग्रहांतील पत्रें यादींतील ११ वें पत्र १७४० च्या २९ सप्टेंबराला चिमाजीअप्पानें लिहिलें आहे. ह्याच संग्रहांतील ४९ व्या पत्रांत १७४१ च्या जानेवारींत बाजीरावाला मरून आठ महिने न झाले तोच चिमाजी अप्पा वारले म्हणून बाळाजी बाजीराव धावडशीच्या स्वामीस लिहितो, ह्यावरून बाजीराव १७४० च्या मेंत वारला हें स्पष्ट आहे. असो. इस १७४७ च्या पुढें गोविदपंत फौजफाटा ठेवून बुंदेलखंडांत अंमल बसवूं लागला. १७५४ त गोविंद बल्लाळ बराच वजनदार मामलतदार झाला होता (लेखांक ३६). ह्या वेळीं अंतर्वेद व बुंदेलखंड ह्या प्रांतांतील पेशव्यांच्या व सरदारांच्या वांटणीचा मुलूख त्याच्याकडे कमाविशीनें होता (लेखांक ६१) लेखांक ६१ (१४ मार्च १७५७) त जनकोजी शिंद्यानें बाळाजी गोविंदाला कमावीसदार म्हणून हुकूम केला आहे. लेखांक ६० त रघुनाथरावदादा गोविंद बल्लाळाला मातब्बर मामलतदार म्हणून म्हणतो व त्याचा मुलगा जो बाळाजी गोविंद त्याला मगरूर म्हणून नांवे ठेवितो. लेखांक ५४ त रघुनाथरावदादा गोविंद बल्लाळाची गणना लहान थोर वगैरेत करितो. १७५७ त “आपल्या मुलुखांतील चौकशीचा मजकूर पेशव्यांच्या मनांत होता” असे लेखांक ५४ वरून दिसतें. ह्यावरून १७५७ त आपल्या मुलुखांतील मामलतदार जे गोविंदपंत वगैरे मंडळीं त्यांच्याविषयीं पेशव्यांना संशय येऊं लागला होता, हे उघड आहे. १७५७ त खेतसिंगाकडील वकील रघुनाथरावदादांकडे गेले असतां बाळाजी गोविदाला मोठी भीति पडली व गोविंदपंताला ही बातमी ताबडतोब कळवा म्हणजे ते पुण्यास “जी खबरदारी करणे ती करतील” अशी त्याने आपल्या कारकुनांना सख्त ताकीद केली. कां कीं, खेतसिंगाचे वकील रघुनाथरावाला स्वतंत्रपणें जाऊन भेटले असतां आपलीं कारस्थानें बाहेर पडतील अशी बाळाजी गोविदाला भीति पडली होती. गोविंदपंत आपल्या मामलतींत पैशाची अफरातफर करतो असा संशय पेशव्यांना आल्यावरून येरंडे व कानिटकर हे दोन दरखदार १७५७ त पेशव्यांनीं गोविंदपंताबरोबर दिले. त्यांनीं गोविंदपंताविरुद्ध खालील नऊ तक्रारी आणिल्या (लेखक १४१).