Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१५२]                                        ।। श्री ।।                    १० जानुआरी १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकपंतनाना व राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसीं:

पोष्य रघुनाथ२१९ बाजीराव नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लिहिला अभिप्राय विदित झाला. प्रस्तुत इकडे मोगलाचा कलह प्राप्त जाहला आहे. याचा निर्गम थोडकियाच दिवसांत होऊन येईल. तद्नंतर त्या प्रांतें फौजा रवाना होतील. प्रस्तुत मल्हारबाहि जवळ असतील त्यांस मेळवून दोन्ही सरदार येकत्र असलियास उत्तम रीतीनें पठाणाचें पारिपत्य होईल. पठाणांत कांहीं फार बल२२० नाहीं व त्यांनीं मागील वर्षी दहशतहि खादली आहे. सारांश एकदिल फौज असलिया तें काम सहजांत आहे. तुह्मी शाहणे तेथें आहां. हरकसे चार२२१ दिवस रंग राखालच. जाणिजे. छ २० जमादिलावल. सविस्तर तीर्थरूप लिहितील त्याजवरून कळेल. हे विनंति.