Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
श्रीरंगपट्टणाचा राजा कंठीरव; तंजापुरचा विजयराघव राजा; चेंदीचा राजा वेंकटनायक; मधरेचा राजा त्रिमल नायक; वालीगुंडापुरचा राजा अरिकाल वेंकटनायक; विधानगरचा राजा रंगशाई नायक; हंसकूटपुरचा राजा तन्नोगौड नायक; वरकड पाळेपट्टचे राजे कित्येक । या इतक्या राजास ही जिंतून. करभार यापासून घेतला । तो समग्र अलियदलशाहास पाठविले । तेणें कडून शाहा मजकूर फार संतुष्ट होऊन, नूतन ब्यंगळूरचें राज्य आपण स्थापिले होते, ते पानसुपारीस शाहजी राजास जाहागीर दिल्हे । शाहजी राजानी, ब्यंगळूरास येऊन पाहते वेळेस, किल्ला मजबूद स्थळ हीं, वास योग्य, भोसल्या करितां सातारांतून संसार तमामास बलाऊ पाठऊन घेऊन, आपण ब्यंगळूरीच वास्तव्य करून शिवाजी राजे व येकोजी राजे उभयतांस सकळ विद्या अभ्यास करविले । तेव्हां शिवाजी राजे यांस बारा वर्षाचें वय झालें । शूर हीं जाहले । त्या समई शाहजी राजास स्वप्नांत श्रीसांबशिवानी येऊन, शिवाजी राजास येथें ठेऊन घेऊ नका; या कडून उदंड कार्य होणार आहे. त्याकरितां यास सातार पुणे प्रांतास पाठवून द्या; ह्मणून आज्ञापिले। तेव्हां शाहाजी राजानी, ज्येष्ठ भार्येपासून जाहली संतती येकोजी राजे जाहले. करितां वयान धाकुटे जाहले, तरी मानास हेच वडील म्हणऊन, आपलें यीवराज्य पदें व ब्यंगळूर तक्त ही शकें १९६२ विषुसंवत्सरी आपले कुलदैवतही येकोजी राजास देऊन आपली विरुदें समग्रहीं येकोजी राजास देऊन शिवाजी राजास सातार पुणें प्रांताचे राज्यास शकें १५६२ विषुसंवत्सरी तक्त बांधून पाठविले । तदनंतर शिवाजी राजे सातारगडास पाऊन, अजुबाजूचे गड किले दुर्गे कित्तेक बाच्छाई मुलुकुचे बांधून, राज्य करूं लागले। शाहजी राजे ब्यंगलूरीच होते । त्यास अल्लीयदीलशाहानी दोने तीनदा बलाउंन पाठविले । त्यास शाहाजी राजे निराकरण करूं लागलेसेच होते । त्यावरून, अल्लीयदल्शाहास शाहाजी राजे बलाविलियां येत नाहींत.