Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
त्या विजय राजानी आपली कन्या जयंतीबाई ह्मणारीस शाहजी राजाचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजास देतों म्हणून सांगून पाठविले; तेव्हां शाहजी राजानी, त्या मुलीस व आपले पुत्र संभाजी राजास हीं घटीत पाहून, तदनंतरें विजापूरांतून आपल्या संसारास हीं बलाऊन पाठऊन, शिवनेरी गडास जाऊन, संभाजी राजाची लग्नसित्धी केले। तेव्हां निजामशाहानी शाहजी राजास मोगलाची फौज घेऊन येणार दर्याखानवरी, आपल्या स्तोम कडून जा ह्मणून निरोपून, यादव राजास आपल्या भेटीस या म्हणून बलाऊन पाठविले । तेव्हां शाहजी राजाची दुसरी स्त्री जिजाईबाई साहेब पूर्णगर्भ होते; त्यांस व कित्तेक सैन्य ही त्यांचे संरक्षणास शिवनेरी गडांतच ठेऊन, वरकड सैन्यानिशी आपण दर्याखानाचें मोकाविलेस गेले । गेल्या ठांई दर्याखानासी युत्ध करुन, मोगलाची फौजा समवेत दर्याखानास पळऊन जय पाऊन शाहजी राजे परतून शिवनेरी गडास येतो, इतक्यांत जिजाईसाहेब यांस पूर्ण गर्भ होता तो शालीवाहन शकें १५५१ त्यास इंग्रजी वर्ष सन् १६२८ इसवी प्रमोदूत सवत्सरी प्रसव होऊन पुत्रोत्छव जाहला-सवेंच शाहजी साहेब यांचे पोटी पुत्रसंतान जाहले । त्या पुत्रास येकोजी राजे ह्मणून नाव ठेविले । हे येकोजी राजे वंशांत चारे येकोजी राजे जन्मले ते । शालीवाहन शके १९५२ प्रजोत्पति संवत्सर पेसजी शाहजी राजानी निजामशाहाचे साहायास्तव शिवनेरी गडांत आपल संसार ठेऊन, मोगलासरदार दर्याखानावरी जाऊन, लडाई करून त्या दर्याखानास पळवुन आले होते कीं तो दर्याखान शाहाजी राजाकडून पराजय पाऊन माघारला । तो पलीकडे न जातां ताप्ती नदी तीरींतच आपल्या फौजेनिशि राहिला होता । त्यातें या निशामशाहाची अव्यवस्थ स्तिति व यादव राजे स्वर्गस्थ जाहले ते विध शाहाजी राजे निश्चयेकडून विमनस्क होऊन स्वस्थळास जाऊन पावल ते, अैसें हें समग्र कळून घेतल्यावरी आतां निजामशाहाचे राज्य स्वाधीन करुय्ये