Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्वमर्यादा पाहीनासें चालते केलें तदनंतरें चन्नपुटण गौनरमेंटास अधिकारी ऐसे शिराजबल केमल यांस या दुष्ट सामादिकानी आपण केला योचना शेखर पावणेस उपपत्ती जैसी कीं तदनुसार योचना करून लेडीकेबलाख जाणतें करून त्यां कडून शिराजबल केमलास बोधविलें शिरीजबलकेमलानी त्या बोधनेचा अंगिकार करून या विषयास बंगालचे गौनरमेंटास परियाय कडून जैसें लिहावें की तैसें लिहून निरोप आणऊन घेऊन आपण तंजाउरास येऊन पावले,या अगोदरीच त्या दुष्ट सामादिकानी तंजाउरांत असणार इंगरेज सरदारासहीं, अपल्या स्वमतास अनुसरून कोणत्या बोलण्यास हीं पुढें नहोतां असावें याजोगें सांगून ठेविले होते. शिराजबलकेमल तंजाऊरास पावल्यानंतरे शरफोजी राजा कडील अमरसिंगाकडील्या खेरीजमद्यत असणारांस विचारून कळून घेतों ह्मणावयाचा युक्त प्रकार दाखऊन मध्यस्त वाराजण पंडीत म्हणून कधिहीं शास्त्रच न जाणते ऐशे दुष्ट सामादिकांपासून सोडिले त्यास मिळऊन शास्त्ररीती येकीकडें ठेऊन लौकीक न्याय हीं कळना त्यास आपल्या समतानुसार त्यांची साक्षी उभऊन घ्यावें याजोगी विचारणा करून बारामध्यस्तीच्या सांगण्यावरूनच या राज्यास अमरसिंगच बाध्य ह्मणऊन शक १८०९ प्लवंगनामसवत्सरी अमारशिंगास तंजाउर राज्याचे तक्त निशीनें केले त्या नंतरें अमरशिंग राजानीं राज्यभार करणेंत निजबाध्य ऐसे शरफीजीराजास सहज बाध्यता असतांहीं तुळजा महाराजानी विहितरीतीनें युक्त प्रकारें दत्त घेऊन कुंपणीसही निरविल्या करितां सर्वविध कडून हीं बाध्य ऐशा शरफोजीराजास अमरशिंग यानी मत्छरें कडून करावें याचा उपद्रव सर्वहीं मेस्तर स्वाचिपादबू साहेबानी पूर्वापार शोधून पाहून विचारणा केल्या ठायीं शरफोजी राजाच्या निज वानें स्वारचे बादरी साहेबाचे दये युक्त अंतःकरणान वोढिले याकरितां त्यानी हा अर्थसमग्रहीं इंग्रेज कुंपणीस जाणतें केले त्या संधींत कुंपणी,