Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
ह्मणावयाच दृढ बुत्धीनें, निजामशाहावरी चालि करू आला । त्या दिवसांत निजामशाहा देवगिरी दुर्ग सोडून धारगिरि दुर्गांत होते । निजामशाहाकडील या रीतीचें वर्तमान येकंदर अल्लियदल्शाहास कळून, या उपरी निजामशाहाची दौलत राहणार नाहीं, तो मारला तरी पडाउ तरी जाईल, परंतू धारागिरीचा किल्ला फार मजबूद; तैसा किल्ला दर्याखानाचे हातास लागल्यानें ते असल्यास नित्य नूतन शल्य होईल, यास्तव तो धारगिरीचा किल्ला अपल्या स्वाधीन घ्यावा म्हणून, अल्लियदलशाहा अपल्या फौजेनिशि चाले करून धारागिरीवरी आले हे बातमी दिल्लीस पाक्लें । तेव्हां दिल्लीचे तक्त जाहगीर बादशाहास होत ते, त्यानी देवगतीस पाऊन त्यांचे बलदायक अलगिरी बादशाहा त्यास प्रतिनाम अवरंगजब म्हणून हीं ते अवरंगजब निजामशाहानी फादशाहा अपली करावी म्हणून सर्वत्र निघून आले । हे बातमी समग्र शांतजी राजास पावली । त्यानी हे कोणत्या सजातें पाहूं, म्हणुन, अपल्या स्थळीच राहिले । तेव्हां, अवरंगजबानी आपल्या वडीलांकडून प्रेषीत होऊन आला । अैसा दर्याखाना सहित धारागिरी किल्यावरी येक्याबाजूस मोरचे देऊन युत्ध केले । तैसेंची येक्या बाजूस अल्लियदल्शाहानी मोरचे देऊन युत्ध केले । त्यांत निजामशाहाचा निर्वाह नाहीस, दौलत समग्र बुडून जाऊन आपण हीं अवरंगजबास स्वाधीन होऊन गेला। सवेंच त्या अवरंगजबानी अल्लियदल्शाहासि युत्ध करून, पळऊन आपण देवगिरि दुर्गांत स्थाई होऊन, राज्य परिपालन करूं लागले । तेव्हां सातारगडांत होत ते शाहजी राजे यानी केली तजबीज जंवरी निजामशाहा अपल्या दौलतेनिशि होते तंवरी अल्लियदल्शाहा दिल्लेश्वर अैसा अवरंगजबासी मिळून होते । प्रस्तूत धारागिरी दुर्गानिमित्त अल्लियदल्शाह अवरंगजबासीं विरोध प्राप्त जाहल्याकरितां, अवरंगजब आपल्या फौजे निशि मात्र राहिले । या उपरी, अल्लियदल्शाहाचि अवरंगजबाची मिळणी होणें नाहीं । करितां अपल्यास पेसजी निजामशाहानी जाहगीर दिल्ही;