Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
चे तरफेन मेस्तर राम ह्मण्णार सरदार तंजाउर रिशिडेण्टीस आले. त्या मेस्तर राम ह्मण्णार रिशिडेण्टास मेस्तर स्वारचे पादविसाबानी कुंपणीस जाणविला अर्थ विलायतीस पाऊन तेथून कोर्टीफडिरेक्टरचे निरोपाप्रमाणें गौनरमेंटाच्यानी लिहिले जे शरफोजी राजास अमरशिंग याचें निर्बेधाखेरीज करून ठेऊन त्याचें संरक्षण करा ह्मणून त्यांस तेणें प्रमाणेंच राजे मजकुरासी वेगळें स्थळी दिवाण वाड्यांतच ठेऊन रक्षणार्थ कुंपणीचे लोकहीं देऊन तदनंतरें त्यानी मेस्तर स्वार्चाकडूनहीं कित्येक व तंजाउराचे पंडिताकडुनहीं शरफौजीराजाची बाध्यता कळून घेऊन प्रस्तुत शरफोजी राम खर्चासहीं चालावया बाटार्थ कुंपणीस जाणतें केला तेहीं इंग्रीज कुंपणीवाल्यानी मनास आणून शरफोजी राजास व त्याचे संसारासहीं विद्यमानानुसार खर्चासही करून ठेवले. त्यावरी शरफोजी राजानी वृथाकाळ जाऊं देईनासें मेस्तर स्वार्चाकडून इंग्रजी लिहिण्या बोलण्याचे अभ्यास स्वमनें केलें तेव्हा मेस्तर स्वार्च पादरी साहेब यानी अंत:करण पुरःसर त्यांस करविले तेणेकडून राजे मजकूर इंग्रजीचा अभ्यास चांगल्यारीतीनें केलें तैसेंच स्वजाती लिफी महाराष्ट्र व बाळोबदही अभ्यासिले व अरविलिफीहीं अभ्यासिले तशामध्येहीं अमरशिंगानी प्रतिपदिहीं उपद्रवच करू लागले करितां सकळहीं मेस्तर स्वार्चास शरफोजी राजानी वोपीले मेस्तर स्वार्चानी हे येकदर मनास आणून कंपेनीस जाणविले त्यावरून कुंपनीवाल्यानी शरफोजी राजे व त्यांचे मातोश्री या उभयताचे हीं मनोगत कळून घेऊन तदनुसारच राजे मजकूर चन्नपटणास येणेस निरोप पाठविल्यासरिसेंच शरफोजीराजे व त्यांचें मातोश्री या उभयतानीहीं चन्मपटणास पाऊन कुंपणीच्या आश्रयांत राहिले तेव्हां समागमें आलते मेस्तर स्वार्चा पादरी साहेबयानी मेस्तर जरीख पादरी साहेबास आपले कार्यास ठेऊन आपण तंजाउरास परत् आले तेव्हा कंपिनिवाल्यानी शरफोजी राजे व त्यांचे मातोश्री उभयतांसही आदरें मानकडून चालविले